Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची जोपासना : माजी आमदार घुले

 शहरटाकळी प्रतिनिधी - आधुनिक तंत्रज्ञानाच्या व धावपळीच्या युगामध्ये आरोग्य सुविधेकडे दिवसेंदिवस होणारे दुर्लक्ष, व त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना

जामखेडमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
Ahmednagar : नाशिक-पुणे महामार्गावर सीएनजी गॅस वाहतूक करणारा टेम्पोचा अपघात | LOKNews24
१०० सेकंदात १५ ठळक बातम्या | सुपरफास्ट महाराष्ट्र | Marathi News | LokNews24

 शहरटाकळी प्रतिनिधी – आधुनिक तंत्रज्ञानाच्या व धावपळीच्या युगामध्ये आरोग्य सुविधेकडे दिवसेंदिवस होणारे दुर्लक्ष, व त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आपल्या आरोग्य समस्यांवर उपचार करून घेणे परवडत नाही. अनेक रुग्ण आजारपण आपल्या अंगावर काढतात. यासाठी सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करने गरजेचे आहे. त्यामुळे आजारपणाचे निदान होऊन डॉक्टरांना उपचार करणे शक्य होते.  सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासविण्याचे काम हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आरोग्य शिबिराच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे जोपासत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केले.

शेवगाव तालुक्यातील शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे हनुमान मंदिर सभागृहामध्ये गणेश उत्सव व सहकार महर्षी लोकनेते कै, मारूतरावजी घुले पाटील यांच्या ९४ व्या जयंती निमित्ताने  हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान शहरटाकळी आयोजित   सांधेदुखी मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून माजी आमदार चंद्रशेखर घुले बोलत होते.

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सुदामदेव महाराज शास्त्री (दधनेश्वर शिवालय दहीगाव ने), माजी पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज भैया घुले पाटील जेष्ठ नेते शिवाजीराव गवळी, जेष्ठ नागरिक शंकरराव ठोंबळ, माजी सरपंच सुभाष पवार, उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे, विस्तार अधिकारी जाधव भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य संभाजीराजे गवळी, राजेंद्र चव्हाण, श्रीराम काकडे, संदीप राऊत,  रोहिदास चिकने, राजेंद्र बोरुडे, मानियल कोल्हे आदीसह मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिबिरामध्ये निसर्गोपचार तज्ञ योगेश भालेराव (शिरूर), आनंद शिरसकर (अमरावती), विश्वजीत खांडेकर (पंढरपूर) लीलाबाई डोळस मॅडम, यांनी सुमारे २१० रुग्णावर उपचार केले.

प्रास्ताविक रविंद्र मडके यांनी केले तर सूत्रसंचालन माजी ग्रामपंचायत सदस्य महेश भालेराव यांनी केले तर आभार सिताराम कुंडकर यांनी मानाले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामचंद्र गिरम,ग्रामपंचायत सदस्य महेश भालेराव , रविंद्र मडके, वसंत कावले, नितीन कनके, मेजर रमेश नरवडे, ॲड, महेश आमले ,शेखर जोशी आदींसह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS