Homeताज्या बातम्यादेश

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत सीआरपीएफचा अधिकारी शहीद

श्रीनगर : जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे हल्ले सुरूच असून सोमवारी उधमपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत सीआरपीएफमधील अधिकार्‍

उत्तरप्रदेशात आणखी एक एन्काउंटर
महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करणार्‍याचा एन्काऊंटर
उत्तरप्रदेशातील गँगस्टर अतीकचा मुलगा असदचा एन्काऊंटर

श्रीनगर : जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे हल्ले सुरूच असून सोमवारी उधमपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत सीआरपीएफमधील अधिकार्‍याला वीरमरण प्राप्त झाले आहे. दहशतवाद्यांसोबतची ही चकमक उधमपूरमधील डुडू तालुक्यातील चिल परिसरात झाली. डीआयजी मोहम्मद भट सोमवारी दुपारी 3च्या सुमारास सुरक्षा दलासोबत गस्त लावत असताना दहशतवाद्यांसोबत चकमक झाली.

या चकमकीत दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा पाडाव करण्यासाठी सर्च अ‍ॅण्ड डेस्टॉय ऑपरेशन सुरू केले. या ऑपरेशन दरम्यान सीआरपीएफमधील इस्पेक्टर कुलदीप सिंह हे शहीद झाले. ते हरियाणाचे होते. सीआरपीएफची एक तुकडी गस्त घालत असताना शेतात लपलेल्या दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. सुरुवातीला दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले. मात्र सुरक्षा दलांनी त्यांचा पाठलाग केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात कुलदीप सिंह यांना गोळी लागली होती. रुग्णालयात नेत असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले. या घटनेनंतर घटनास्थळी अतिरिक्त पथक पाठवण्यात आले. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला तेथून पोलिस चौकी फक्त 8 किलोमीटर दूर आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली असतांना, या प्रदेशात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात येत असतांना देखील दहशतवाद्यांचे हल्ले वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे या प्रातांतील सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, विधानसभेच्या निवडणुका ही सरकारची आणि भारतीय सैन्याची कसोटी ठरणार आहे. 

COMMENTS