Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 माघी एकादशीच्या सोहळ्या निमीत्त पंढरपुरात भाविकांच्या गर्दी 

पंढरपूर प्रतिनिधी - पंढरपुरात माघी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त विठ्ठल भक्तांच्या भक्तीचा मळा फुलला आहे. मागील एकादशीच्या सोहळ्यासाठी सुमारे चार ल

चीनची आण्विक पाणबुडी बुडल्याचा दावा
माजी आमदार पिचड यांच्यामुळे धान खरेदी केंद्र सुरू
बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन

पंढरपूर प्रतिनिधी – पंढरपुरात माघी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त विठ्ठल भक्तांच्या भक्तीचा मळा फुलला आहे. मागील एकादशीच्या सोहळ्यासाठी सुमारे चार लाखाहून अधिकचे भावीक पंढरपुरात दाखल झाले आहेत. टाळ मृदंगाच्या विठ्ठल नामाच्या गजरात अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. माघी एकादशीच्या सोहळ्याची सुरुवात विठ्ठल मंदिरात पहाटेच्या नित्यमहापूजेने करण्यात आली. मंदिरे समितीच्या सदस्या शकुंतला नडगीरे यांच्या हस्ते विठ्ठलाची नित्यमहापूजा संपन्न झाली. यावेळी विठ्ठलाच्या आरतीनंतर एकादशीच्या सोहळ्यात सुरुवात झाली. एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण मंदिरास झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तर परंपरेप्रमाणे विठ्ठल दर्शन , विठ्ठलाचे कळसाचे दर्शन,  चंद्रभागास्नान , नगर प्रदक्षिणा करण्यास भाविकांनी पहाटेपासूनच सुरुवात केली होती. या एकादशीच्या सोहळ्यासाठी बेळगाव ,कोल्हापूर, विदर्भ, मराठवाडा यासह कर्नाटक व आंध्र प्रदेश येथूनही भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. पदस्पर्श दर्शन रांग पाच किलोमीटर पेक्षा लांब गेल्याने विठ्ठल दर्शनासाठी साधारण सहा ते सात तासांचा कालावधी लागत आहे. भगवी पताका, टाळ मृदुंगाचा गजर , भजन कीर्तनाचा रंग अशाने सारी पंढरी नगरी विठ्ठलभक्तीत न्हाऊन निघाली आहे. आज माघ शुद्ध एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली आहे. देवाचा गाभारा, चौखांबी, सोळखांबी,सभा मंडप अशा ठिकाणी झेंडू, गुलाब, आष्टर,मोगरा अशा विविध पानाफुलांची आकर्षक सजावट केली आहे. पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांनी ही सजावट केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून त्यांची ही सेवा सुरू आहे.

COMMENTS