Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगावात पाण्याअभावी पिके जळण्याच्या मार्गावर ‘ताजनापूर’चे पाणी माळेगाव-ने व ठाकूर निमगावच्या तलावात सोडण्याची मागणी

शेवगाव : ताजनापूर लिफ्ट सिंचन योजनेच्या टप्पा क्र. २ मधील पाणी शेवगाव तालुक्यातील माळेगाव-ने व ठाकूर निमगाव येथील तलाव आणि बंधाऱ्यांमध्ये सोडण्या

कोपरगाव नगरपरिषदेस १ कोटींचे अनुदान : संधान
विचारांचा दुष्काळ दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरीची रचना : हभप म्हस्के
कृषी संकल्प उत्तम; पण ‘कायाकल्प किती होणार’? : डॉ. मुळीक 

शेवगाव : ताजनापूर लिफ्ट सिंचन योजनेच्या टप्पा क्र. २ मधील पाणी शेवगाव तालुक्यातील माळेगाव-ने व ठाकूर निमगाव येथील तलाव आणि बंधाऱ्यांमध्ये सोडण्यात यावे, जेणेकरून पाण्याअभावी शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टळेल, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी गुरुवार दि १२ रोजी केली आहे. या मागणीचे निवेदन शिवसेना नेते ऍड. विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे व हर्षदा काकडे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने लघु पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे व कार्यकारी अभियंता जगदीश पाटील यांना अहिल्यानगर येथे दिले.

यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ गावडे, माळेगाव-नेचे उपसरपंच रामनाथ भालेराव, पांडुरंग गाडेकर, पुंजाराम भिसे, हिराजी देशमुख, आनंदा देशमुख, सुभाष गावडे, पंढरीनाथ सुडके यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र. २ मधील पाणी दरवर्षी चापडगाव, वरखेड व सोनेसांगवी येथील तलाव व बंधाऱ्यांमध्ये सोडले जाते. मात्र यंदा उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून माळेगाव-ने व ठाकूर निमगाव ही गावेही या योजनेच्या कार्यक्षेत्रात येतात. या परिसरातील बहुतांश विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत.

शेवटच्या टप्प्यातील पाण्याअभावी ही पिके जळण्याच्या स्थितीत असून, ताजनापूर योजनेचे पाणी संबंधित गावांतील तलाव व बंधाऱ्यांमध्ये सोडल्यास विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना आवश्यक पाणी देता येऊन पिके वाचतील व आर्थिक नुकसान टळेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

तसेच गेल्या दोन वर्षांपासून चापडगाव येथील बंधाऱ्यात नियमित पाणी सोडण्यात येत असल्याने त्या परिसरातील शेतीची परिस्थिती समाधानकारक आहे. त्याच धर्तीवर माळेगाव-ने व ठाकूर निमगाव येथील तलाव व बंधाऱ्यांमध्येही पाणी सोडल्यास स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS