मुंबई ः शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून संकटात आहे. निवडणूक आचारसंहितेचे कारण देत शेतकर्यांना मदत केली नाही. मात्र आता कोणतीही आचारसंहिता नसतांना
मुंबई ः शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून संकटात आहे. निवडणूक आचारसंहितेचे कारण देत शेतकर्यांना मदत केली नाही. मात्र आता कोणतीही आचारसंहिता नसतांना शेतकर्यांना वार्यावर सोडण्यात येत आहे. पिकांच्या नुकसानीबाबत मदत पोहोचली नाही. शेतकर्यांबाबत सरकारला संवेदना असतील तर सरकारने शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे. शेतकर्यांवरील संकट म्हणजे सरकार पुरस्कृत संकट असल्याचा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी केला.
यावेळी वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. पुढे बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, कांदा निर्यात बंदी, दुधाचे दर आणि इतर गोष्टींमुळे शेतकरी उद्ध्वस् होत आहे. सरकारला शेतकर्यांच्या डोळ्यातील अश्रूच दिसत नाहीत. एमएसपीचे दरही शेतकर्यांना मिळत नाही. सरकारला माझी विनंती आहे की बळीराजाच्या डोळ्यात बघा. शेतकरी उपाशी आहेच मात्र पशुधनही उपाशी आहे. लाखांच्या पोशिंद्याला शेतकर्यांना हात पसरावे लागत आहेत. शेतकर्यांची झोप उडाली आहे. सरकारकडून शेतकर्याला जाहीर झालेले काहीच दिलेले नाही. शेतकर्यांना या संकटातून बाहेर काढायचे असेल तर त्यांचे वीजबिल, कर्ज माफ करावे लागेल अशी अपेक्षा देखील वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. शेतकर्यांबाबत सरकारला संवेदना असतील तर सरकारने शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे. सरकारने पीकविमा कंपन्यांचे लाड पुरवले आहेत. याबाबत घोटाळे बाहेर आले आहेत. केंद्र सरकारचीही मदत मिळाली नाही. खारीक हंगाम वाईट गेला. महायुतीच्या काळात पाच हजार पेक्षा अधिक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याबाबत सरकारला देणेघेणे नाही. हे सरकार शेतकर्यांचे भले करू शकत नसल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. दरम्यान, विधानपरिषदेत पुणे पोर्शे प्रकरणी चर्चा झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुणे अपघाताप्रकरणी पुण्याच्या पोलिस आयुक्तांच्या बदलीची मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत कुणाचंही ऐकून मागणी करू नका असे स्पष्टपणे म्हटले आहे.
रोहित पवारांचे एमआयडीसीसाठी आंदोलन – कर्जतमध्ये एमआयडीसी करण्याच्या मागणीसाठी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी गुरूवारी विधानभवनाच्या पायर्यावर आंदोलन केले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकांना रोजगार सरकार देणार आहे. त्यामुळे रोहित पवारांची मागणी सरकारकडून मान्य केली जाईल.
उपराष्ट्रपतींच्या संबोधनावरून सभागृहात गदारोळ – माजी उपराष्ट्रपती गुरूवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार होते. मात्र या संबोधनावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. शेतकर्यांच्या प्रश्नांपेक्षा, हिट अॅड रनच्या घटनांपेक्षा उपराष्ट्रपतींचे संबेाधन महत्वाचे आहे का, असा संतप्त सवाल यावेळी विरोधकांनी केला. यावरून ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव म्हणाले, उपराष्ट्रपती यांचे संबोधन हे विधानसभेच्या सभागृहात होणार आहे. हे कधीच घडले नव्हते. यावरून अध्यक्ष म्हणाले, उद्या मतदान असल्याने सेंट्रल हॉल निवडणूक आयोगाच्या ताब्यात देण्यात आला आहे. नाना पटोले म्हणाले, उपराष्ट्रपती म्हणजे काय फार मोठे झाले का? त्यापेक्षा जनतेचे प्रश्न महत्वाचे असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
COMMENTS