तब्बल 22 वर्षांपासून फरार गुन्हेगार अखेर जेरबंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तब्बल 22 वर्षांपासून फरार गुन्हेगार अखेर जेरबंद

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर, पुणे, जालना व बीड जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेला व मोक्का अंतर्गत कारवाई झालेला गुन्हेगार स्थानिक

नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती निकृष्ट पद्धतीने
कोपरगाव तहसील आवारात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात
जामखेड शहरात नागरी सुविधांचा बोजवारा

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर, पुणे, जालना व बीड जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेला व मोक्का अंतर्गत कारवाई झालेला गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे. जिल्ह्यातील शेवगाव पोलिस ठाण्यात सन 1999 साली दाखल गुन्ह्यात 22 वर्षांपासून तो फरार होता. उत्तम काशिनाथ गायकवाड (रा. माजलगांव, जि. बीड) असे या आरोपीचे नाव आहे.
शेवगावमध्ये दरोड्याच्या तयारीत असल्याचा गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल होता. यात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखाच्या विशेष पथकाला वॉरंटची तत्काळ बजावणी करण्याचे आदेश दिले होते. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस नाईक संतोष लोढे, आडबल, संदीप चव्हाण, सुरेश माळी, देवेंद्र शेलार, हेडकॉन्स्टेबल संभाजी कोतकर यांच्या पथकाने आरोपी उत्तम गायकवाड याला बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील केसापूर कॅम्प परिसरातून ताब्यात घेतले.

तीन दिवस तळ ठोकून
पथकाने तीन दिवस त्याच्या वास्तव्याची माहिती घेतली. तो अवैध दारुचा व्यवसाय करीत होता व वारंवार ठिकाण बदलत होता. पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले. आरोपी गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द नगर, पुणे, जालना व बीड जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, मोक्का व दारुबंदी असे 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत. माजलगाव शहर पोलिस ठाण्याने सन 2017 मध्ये मोक्का कायद्यातंर्गत त्याच्यावर कारवाई केली आहे. नगर जिल्हा पोलिसांनी मागील दोन महिन्यांपासून फरार असलेले तसेच विविध गुन्ह्यात हवे असलेले आरोपी शोधण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत पकडलेल्या आरोपींकडून अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत. ही मोहीम नियमितपणे सुरू ठेवण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत. दरम्यान, पोलिस ठाण्यांच्या स्तरावर फरार आरोपींच्या शोधासाठी पुरेशा गांभीर्याने प्रयत्न होत नसल्याचेही चित्र दिसत आहे.

COMMENTS