Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपहरण प्रकरणी आमदाराच्या मुलावर गुन्हा

मुंबई प्रतिनिधी - शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे अडचणीत येण्याची शक्यता आहे. व्यावसायिकाच्या अपहरणाप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र

जागतिक बानकामगार प्रथा विरोधी दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीन व्यंगचित्राचे प्रदर्शन संपन्न
टाळेबंदीचे काही निर्बंध हटवणार ; एक जूनपासून कार्यवाही; काही राज्यांचा होणार अपवाद
सांगवी पाटण येथील शेतकर्‍यांचे अवकाळी पावसामुळे झाले नुकसान…

मुंबई प्रतिनिधी – शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे अडचणीत येण्याची शक्यता आहे. व्यावसायिकाच्या अपहरणाप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव येथील ‘ग्लोबल म्युझिक जंक्शन’ या कंपनीच्या कार्यालयात बुधवारी हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. बुधवारी दुपारी 10 ते 15 जणांनी ग्लोबल म्युझिक जंक्शनच्या कार्यालयात येऊन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजकुमार सिंग यांना मारहाण करून अपहरण केल्याचे समोर आले होते. हा सगळा प्रकार समोर येताच पोलिसांनी राजकुमार सिंग यांची सुटका केली आहे. मात्र या प्रकरणी पीडित राजकुमार सिंग यांच्या वतीने वनराई पोलीस ठाण्यात स्थानिक आमदार पुत्र राज सुर्वे यांच्यासह चार जणांविरुद्ध अपहरण आणि शस्त्रास्त्र कायद्यासह अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित राजकुमार यांच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण प्रकरण साडेआठ कोटी रुपयांचे आहे, जे राजकुमार सिंग यांनी आदिशक्ती फिल्म्सचे मालक मनोज मिश्रा यांना संगीत निर्मितीसाठी दिले होते. बुधवारी दुपारी त्यांनी करार रद्द करण्यासाठी दबाव आणल्यानंतर हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांनी अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

COMMENTS