देवळाली प्रवरा/प्रतिनिधीः घर खरेदी करण्यासाठी माहेरहून 15 लाख रूपये आणावेत, या मागणीसाठी घोडके या विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला
देवळाली प्रवरा/प्रतिनिधीः घर खरेदी करण्यासाठी माहेरहून 15 लाख रूपये आणावेत, या मागणीसाठी घोडके या विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. तसेच तिला घरातून हाकलून दिले. या बाबत पती व सासू या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रिती घोडके, वय 25 वर्षे, रा. दुध सागर सोसायटी, केडगांव प्लाट नं. 9, शनि मंदिरासमोर, केडगांव, अहमदनगर हल्ली मु. कुंभार गल्ली, वांबोरी ता. राहुरी. या विवाहित तरूणीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, 31 मे 2019 रोजी प्रिती विशाल घोडके हिचा विवाह अहमदनगर तालूक्यातील केडगांव येथील विशाल दत्तात्रय घोडके यांचेशी झाला होता.
प्रिती घोडके या तरूणीला सुरुवातीचे दोन ते तीन महिने व्यवस्थीत नांदवले. त्यानंतर प्रिती हिचा पती व सासू हे म्हणाले कि, आपल्याला नवीन घर खरेदी करायचे आहे. त्यासाठी तु माहेरहून 15 लाख रुपये घेवुन ये. तेव्हा प्रिती घोडके त्यांना म्हणाली कि माझ्या वडीलांची परस्थिती गरीबीची असल्याने ते येवढे पैसे देवु शकणार नाही. पैसे आणत नसल्यामुळे पती व सासूने प्रिती घोडके हिला लाथाबुक्यानी मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली. तसेच तीला उपाशीपोटी ठेवून तीचा शारीरीक व मानसीक छळ केला. आणि जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच वारंवार पैशाची मागणी करुन तीला घरातून बाहेर हाकलून दिले. सासरच्या त्रासाला कंटाळून अखेर प्रिती विशाल घोडके या विवाहित तरूणीने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तीच्या फिर्यादीवरून आरोपी पती- विशाल दत्तात्रय घोडके व सासू- बेबी दत्तात्रय घोडके दोघे रा. केडगांव, अहमदनगर या दोघांवर गुन्हा रजि. नं. 106/2023 भादंवि कलम 498 (अ), 323, 504, 506 प्रमाणे मारहाण, जिवे मारण्याची धमकी तसेच शारीरीक व मानसीक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलिस करीत आहे.
COMMENTS