Homeताज्या बातम्यादेश

क्रिकेटपटू ऋषभ पंत अपघात गंभीर जखमी

नवी दिल्ली ः भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला दिल्ली-डेहराडून महामार्गावर हम्मदपूरजवळ शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्य

स्पर्धात्मक भाव मुलांचे भविष्य घडवतो ः प्रफुल्ल खपके
चक्क…अल्पवयीन मुलाने पेट्रोल पंपावरून चोरले 1 लाख 33 हजार रुपये | LOKNews24
काय वाढीव धुतलंय पोरीने या पोरांना…एकच नंबर ! | LOK News 24

नवी दिल्ली ः भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला दिल्ली-डेहराडून महामार्गावर हम्मदपूरजवळ शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ऋषभ पंत जखमी झाला आहे. ऋषभला डेहराडूनमधील रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-डेहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारला (डीएल 10 सीएन 1717) आग लागली. त्यानंतर परिसरातील उपस्थितांनी त्याला गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाली आहे. ऋषभ स्वत: गाडी चालवत होता. गाडी चालवताना डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ऋषभ पंत गाडीत एकटाच होता. अपघात झाल्यानंतर गाडीला आग लागली. त्याला डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ऋषभची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. ऋषभ दिल्लीहून उत्तराखंडमध्ये आपल्या रुडकी येथील घरी येत होता, त्यावेळी ही दुर्घटना घडली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुडकी येथील नारसन परिसरात ऋषभ पंत याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रेलिंग आणि खांब तोडून उलटी झाली. यानंतर कारला आग लागली. काही स्थानिकांनी ही आग कशीबशी विझवली. त्यानंतर जखमी अवस्थेतील ऋषभ पंत याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, अपघातावेळी बसचालक असलेल्या सुशील नावाच्या व्यक्तीने ऋषभ पंतची मदत केली होती. सुशील यांनी सांगितल्यानुसार ‘ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर ऋषभनेच मला त्याची ओळख सांगितली. मी क्रिकेटपटू ऋषभ पंत आहे, असे त्याने मला सांगितले. ऋषभ पंतच्या कारने पेट घेतला होता. त्यांतर मी धावत गेलो आणि कारची काच फोडून त्याला बाहेर काढले,’ अशी माहिती सुशील यांनी दिली.‘मी हरिद्वारहून येत होतो तर ऋषभ पंत दिल्लीहून येत होता. त्याची कार दुभाजकावर आदळली. त्यानंतर मी माझी बस थांबवून मदतीसाठी धावलो,’ असेही सुशील यांनी सांगितले.दरम्यान, ऋषभ पंत आपल्या मर्सिडीज कारने दिल्लीहून रुरकीला जात होता. यावेळी पहाटे गुरुकुल नरसन परिसरात हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक लोकांनी तत्काळ 108 ला फोन करून पंतला रुग्णालयात दाखल केलं. पंतला गंभीर दुखापती झाल्या असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी होण्याची शक्यता आहे. पंतचं डोकं, गु़डघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्याचा पाय मोडला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रकृती स्थिर, प्लास्टिक सर्जरी करण्याची शक्यता –
ऋषभच्या डोक्याला आणि हाता पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतच्या कपाळावर आणि पायाला दुखापत झाली आहे. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंह घटनास्थळी पोहोचल्या. सक्षम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुशील नागर यांनी सांगितले की, सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे, त्याला रुडकीहून डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी करण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

COMMENTS