Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

न्यायालयीन ऑनलाईन प्रक्रियेने कारकूनी संपली ः काका बैरागी

कोपरगाव तालुका ः वकिलांना सहाय्यक म्हणून एके काळी प्रत्येक वकीलांकडे कारकून असायचा आणि न्यायालयीन प्रक्रियेत कारकूनाला मोठे महत्त्व होते मात्र न्

पंचनामा नको नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या- शीला खेडकर
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत आत्मा मालिक राज्यात अव्वल
‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानात अकोलेकरांनी सामील व्हावे ः पिचड

कोपरगाव तालुका ः वकिलांना सहाय्यक म्हणून एके काळी प्रत्येक वकीलांकडे कारकून असायचा आणि न्यायालयीन प्रक्रियेत कारकूनाला मोठे महत्त्व होते मात्र न्यायालयीन प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे वकीलांचे कारकून व कारकुनी संपली अशी खंत कोपरगाव वकील संघाचे ज्येष्ठ कारकून जगू काका बैरागी यांनी व्यक्त केली.
जगू काका बैरागी यांचा जन्म 1939 मध्ये तालुक्यांतील धारणगाव येथे झाला. जेमतेम मराठी सातवी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले. घराची परिस्थिती बेताची त्यांचे वडील वकिलांचे कारकून म्हणून काम करायचे मात्र शिक्षण अर्ध्यावर सुटल्याने सण 1956 पुर्वी कोपरगाव येथे भुई मुगाच्या शेंगा फोडायचे काम सूरु केले त्यानंतर 1956 मुरलीधर पंत कुलकर्णी हे ड.डी.डी. कुलकर्णी,जी बी पटवर्धन यांचे कडे वकिलांचे कारकुन म्हणून काम करत होते त्यांच्या ओळखीने कोर्टात कारकून म्हणून काम करण्यास सुरुवात केली.1956 कोपरगाव कोर्टात 18 वकिल वकीली करत होते तर कोपरगाव तालुक्याला एक कोर्ट होते तत्कालिन न्यायाधीश आर एन भद्रे साहेब होते. साधारण सहा महिन्याच्या कालावधीत कारकुनी शिकलो.त्या नंतर कोपरगाव येथिल सुप्रसिद्ध वकिल ड आर जी चीने साहेब यांच्या ऑफिस मध्ये कारकुनी कामाला सुरुवात केली. वकिलांची रोजची डायरी लिहिणे अर्ज लिहिणे. तारखा घेणे अशी कोर्टातील व वकिलांच्या घरातील छोटी मोठी कामे करावी लागायची.  दावे,अर्ज सर्व काही हस्त लिखित होते. कोर्टाच्या नकला देखील हाताने लिहाव्या लागत होत्या लिखाण कामासाठी टाक, बोरू व शाई चा वापर केला जात असे त्यावेळी कोपरगाव तालुक्यासाठी अहमदनगर येथे जिल्हा कोर्ट होते सर्व फाईल घेऊन वकिल पक्षकार यांच्या सोबत बस किंवा रेल्वे ने अहमदनगर येथे जावे लागत होते पुणे येथील ड एस बी गुजराथी यांच्या कडे एम आर टी कोर्ट कामासाठी जावे लागायचे. बॅरिस्टर रामराव आदिक यांच्या सोबत मुंबई येथे कारकुनी करण्याचा योग आला.कोपरगाव कोर्टात न्यायाधीश म्हणून असलेले आर बी सुळे,व्ही.के.बेर्डे,जी व्हि.कर्णिक,राजाभाऊ गवांदे आदी न्यायाधीश पुढे उच्च पदावर गेले. अनेक नामवंत वकिलांच्या सोबत सिव्हील,क्रिमिनल प्रकरणे दरखास्त आदी हाताने लिहिण्याचे काम केले. पुढे टायपिंग मशीन वर दावे तयार केले जाऊ लागले त्यासाठी आठ आणे टायपिंग खर्च यायचा तर कारकुनी म्हणून दोन आणे,चार आणे मिळायचे, सुरुवातीच्या काळात  साडे दहा कोर्ट फी तिकीट लावावे लागायच. सण 1956ते 1977 या कालावधी ड आर जी चिने यांचे सोबत फूड अडल्ट्रेशन ची प्रकरणे तयार केली.न्यायालयीन कामकाज घेऊन दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचे ड. गोपाळराव साठे साहेब यांच्या कडे रेंट अँड पझेशनचे काम घेऊन जाण्याचा योग आला. कोपरगाव तालुक्यातील अनेक राजकीय संघर्षाचे दावे प्रतिदावे हाताने लिहिले. ऐन वेळी रात्र रात्र जागून प्रकरणे तयार करून दाखल केले. 1956 ते आज अखेर कारकुनी करत आहे. कारकुनी कामाला 68 वर्षे पूर्ण झाली. मात्र सद्या सर्व न्यायालयीन कामकाज दावे दाखल ते तारखा मिळणे ऑनलाईन झाल्यामुळे वकीलाकडे काम करणार्‍या कारकूनांना काम राहिले नाही अशी शेवटी खंत व्यक्त केली.

COMMENTS