Homeताज्या बातम्याविदेश

अमेरिकेतील टाटा कंपनीला कोर्टाचा दणका; 1,750 कोटी देण्याचे आदेश

वॉशिंग्टन / प्रतिनिधी : टाटा ग्रुपची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (टीसीएस) अमेरिकेत मोठा झटका बसला आहे. अमेरिकन ज्युरीने कंपनीला 210 दशलक्

 अणुऊर्जा औष्णिक केंद्रातील राख जमा करण्याऱ्या कामगारांचे आंदोलन
पणुंब्रे वारूण येथे आत्मा योजनेअंर्गत तांदूळ महोत्सव
मुख्यमंत्र्यांचा अवैदिक संघर्ष !

वॉशिंग्टन / प्रतिनिधी : टाटा ग्रुपची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (टीसीएस) अमेरिकेत मोठा झटका बसला आहे. अमेरिकन ज्युरीने कंपनीला 210 दशलक्ष डॉलर किंवा सुमारे 1750 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यास सांगितले आहे. अहवालानुसार, टीसीएस व्यवस्थापनाने ज्युरीच्या या निर्णयाशी असहमती व्यक्त केली आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार टीसीएसवर अमेरिकन आयटी कंपनी डीएक्ससीने आरोप केले आहेत. डीएक्ससीच्या मते, टीसीएनने बँकिंग प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना विशिष्ट विमा प्रकरणासाठी परताव्याचा दर मोजू शकणारे सॉफ्ट वेअर तयार करण्यात अडचणी येत होत्या.

व्हँटेज सॉफ्ट वेअर हे काम सहजपणे करत असल्याचे त्या कर्मचार्‍यांना आढळून आले. त्यानंतर त्याने व्हँटेजचा सोर्स कोड कॉपी करून वापरला. डीएक्ससी खटल्यासोबत संबंधित टीसीएस कर्मचार्‍यांचे ई-मेल तपशील देखील दिले आहेत.

टीसीएसचे म्हणणे आहे की ज्युरीच्या निर्णयाशी असहमत आहेत. टीसीएसने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की या प्रकरणावर आता न्यायालय निर्णय घेईल. न्यायालयाने दोन्ही पक्षांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. टीसीएसने सांगितले की हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असल्याने ते या विषयावर अधिक भाष्य करणार नाही.

टीसीएस कंपनी टाटा समूहाच्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचा व्यवसाय जगभरात पसरलेला आहे. बाजार मूल्यानुसार, मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर ही देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. त्याचे बाजार भांडवल 12.65 लाख कोटी रुपये आहे. गेल्या शुक्रवारी कंपनीचा शेअर 1.55 टक्क्यांच्या घसरणीसह 3454 रुपयांच्या पातळीवर बंद झाला.

COMMENTS