इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील प्रकाश हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरमधील डॉक्टर व सहकारी स्टाफ यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात मिळालेला अटकपुर्व ज
इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील प्रकाश हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरमधील डॉक्टर व सहकारी स्टाफ यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात मिळालेला अटकपुर्व जामीन इस्लामपूर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने कायम केला. हॉस्पिटलमधील डॉक्टर व इतर कामगारांनी न्यायालयाच्या या निर्णयाचा आदर करत स्वागत केले. आज प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलातील श्री गणेश मंदीरात डॉक्टर व इतर सहकारी स्टाफने श्री ची महाआरती केली.
प्रकाश हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर उरुण-इस्लामपूरमध्ये कोरोनाच्या दोन्ही लाटेत 1515 कोरोना रुग्णावर उपचार केले. हॉस्पिटलमधील सहा डॉक्टर व पाच सहकारी स्टाफ विरोधात योगेश आनंदा खोत, रा. पडवळवाडी, ता. वाळवा यांनी दि. 5 फेब्रुवारी रोजी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती. या 11 जणांना अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने अंतरीम अटकपुर्व जामीन मंजुर केला होता.
इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचार्यांनी तक्रारीच्या अनुषगांने चौकशी करुन सुनावनीच्या दरम्यान न्यायालयात कागदपत्रे सादर करुन फिर्यादीची बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन व कागदपत्राची पहाणी करुन प्रकाश हॉस्पिटल अॅण्ड रिसर्चमधील डॉक्टर व इतर सहकारी स्टाफचा अटक पुर्व जामीन कायम केला. प्रकाश शिक्षण कामगार युनियनच्या वतीने दाखल होत असलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत. म्हणून उपोषण सुरु केले होते अखेर त्यांना न्याय मिळाला.
कोरोनाच्या दोन्ही लाटेत हॉस्पिटलमधील डॉक्टर व इतर स्टाफने कर्तव्य समजुन प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा केली. पहिला अॅट्रॉसिटीसारखा गुन्हा व नंतर तब्बल 10 महिन्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. दोन्ही गुन्ह्यात न्याय देवतेने आम्हांला न्याय दिला. आम्हा कर्मचारी यांच्यासाठी ही संस्था वरदान आहे. आमच्या हाताला काम मिळाल्याने हाजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थीत सुरु आहे. दोन्ही गुन्हे हे खोटे होते, मात्र यामागे राजकीय व्यवस्था असल्याने व पोलिसांवर प्रचंड दबाव असल्याने तक्रारीची सत्यता न तपासता पोलिसांनी गुन्हे दाखल करून घेतले. स्वत:चा जीव धोक्यात घालून वेळप्रसंगी कुंटुबापासून 15-15 दिवस लांब राहुन आम्ही रुग्णांची सेवा केली. या लढाईत आम्ही आमचे दोन सहकारी गमावले, अशी परीस्थीती असताना आम्हाला खोट्या गुन्ह्यांना सामोरे जावे लागते. आमची मानहानी होती याचा आम्हासह आमच्या कुटुंबाला मानसिक त्रास होतो. आम्हाला राजकारणाशी काहीही आज ही आणि उद्या ही काही देणं-घेणं नाही. त्यामुळे समाजात चांगले काम करणार्यांना असा त्रास देऊ नये, अशी विनंती या कुटनितीच्या मागे असणार्या विचाराला आहे. आम्ही न्यायदेवतेने दिलेल्या निर्णयाचा आदर व स्वागत करतो. यापुढे हॉस्पिटलमधील प्रत्येक कर्मचारी देशहीत व कर्तव्य समजुन अधिक जोमाने रुग्ण सेवा करेल, अशी प्रतिक्रिया प्रकाश शिक्षण कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली.
यावेळी श्री गणेशा ची महाआरती करण्यात आली. यावेळी डॉ. गोपाळ गिरीगोसावी, डॉ. विनीत चौधरी, डॉ. अभिमन्यू पाटील, डॉ. अक्षय नरवाड, डॉ. राहुल पाटील, डॉ. विशाल पडवळे, डॉ. निखील उरुणकर, विश्वजीत पाटील, प्रकाश शिक्षण कामगार युनियनचे उपाध्यक्ष सुजीत पाटील, सचिव कुलदीप खांबे, हिम्मत जाफळे, रणजीत पाटील, रणधीर फार्णे यांच्यासह विविध विभागातील विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS