Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाळू भरून जाणार्‍या हायवे टिप्परवर धाडसी पोलिसांची कारवाई

इस्लापूर प्रतिनिधी - किनवट तालुक्यातील इस्लापूर पोलिस ठाण्यात  वाळूची वाहतूक करणारा टिप्पर  इस्लापूर पोलिस प्रशासनाने ताब्यात घेतला असून  मौजे अ

गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कठोर शासन करा
लातुरात अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले; पाच महिन्यात 1 हजार 746 गुन्हे दाखल
सांगोल्यात पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाने खळबळ

इस्लापूर प्रतिनिधी – किनवट तालुक्यातील इस्लापूर पोलिस ठाण्यात  वाळूची वाहतूक करणारा टिप्पर  इस्लापूर पोलिस प्रशासनाने ताब्यात घेतला असून  मौजे अंतेश्वर येथील टिप्पर क्रं एम.एच. 26 बी 9988 ह्या नंबरचा टिप्पर वाळूचा अवैद्य साठा घेऊन गुप्त मार्गाने कोल्हारीकडून इस्लापूरकडे येत होता. ही माहीती  पोलिस प्रशासनाला कळताच , पोलीस स्टेशन इस्लापूरचे एपीआय रवी वाहुळे यांनी त्यांचे पथक घेऊन टिप्परचा शोध घेण्यास सुरुवात केली .त्यावर बारकाईने पाळत ठेवली . इस्लापूर जवळच हा टिप्पर थांबवून टिप्परच्या चालकाकडून कागदपत्राची मागणी केली असता, टिप्पर चालकाने वाळू वाहतूक  रॉयल्टीची पावती नसल्याचे सांगितले. तेव्हा महसूलचे कर्मचारी केशव थळंगे यांना सोबत घेऊन सदरील टिप्पर ताब्यात घेऊन इस्लापूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. . अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती काळजी घेण्यात आली. यावेळी इस्लापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहुळे , चालक आजम , उपनिरिक्षक सुभाष निवळे , शिवाजी तोंडेवाड , पोकाँ . शिवाजी साखरे , अरुण मडावी घटनास्थळी हजर होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे, तलाठी केशव तळंगे अंकुश सक्वान, देविदास कांबळे सुदर्शन बुरकुले, यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल तहसील कार्यालय किनवटला पाठवण्यात आला असे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले,तेव्हा तहसीलदार किनवट यावर काय कारवाई करतील याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

COMMENTS