Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जादा आलेले पाच लाख रुपये परत केल्याबद्दल दांम्पत्याचा सत्कार

फलटण / प्रतिनिधी : फलटण पोस्ट ऑफिसकडून जादा आलेले 5 लाख रुपये परत केल्याबद्दल फलटणचे माजी गटशिक्षणाधिकारी विलास भागवत व त्यांची पत्नी सौ. संजीवनी

सकल हिंदू समाजातर्फे ’हिंदू गर्जना’ भव्य मोर्चा
कामगारांच्या या मागण्या झाल्या मान्य
Solapur : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन l Lok News24

फलटण / प्रतिनिधी : फलटण पोस्ट ऑफिसकडून जादा आलेले 5 लाख रुपये परत केल्याबद्दल फलटणचे माजी गटशिक्षणाधिकारी विलास भागवत व त्यांची पत्नी सौ. संजीवनी भागवत यांचा फलटण पोस्ट ऑफिसकडून सत्कार करण्यात आला.
येथील माजी गटशिक्षणाधिकारी विलास भागवत यांचे पत्नीचे नावे फलटण येथील पोस्टामध्ये बचत खाते आहे. त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे मिळालेले सात लाख रुपये स्टेट बँकेच्या फलटण शाखेत पत्नीचे खात्यावर होते. पोस्टात गुंतवणूक करणेसाठी बँकेकडून एनईएफटी करून पोस्टाच्या खात्यावर पाठवले. सात लाखाची एनईएफटी केलेली असताना 12 लाख पोस्टाच्या बचत खात्यात जमा झाले. बचत खात्याची खात्री केली असता 12 लाख जमा होते. ही बाब फलटण पोस्टाच्या समक्ष विलास भागवत यांनी निदर्शनास आणून दिली. पोस्टाच्या अधिकार्‍यांनी चौकशी केली असता चेन्नई येथील सर्व्हर कडून 2+5+5 असे सात लाख जमा झाले आहेत. 5 लाखाची दुबार एंट्री झाली. विलास भागवत यांनी सदर जादा रक्कम परत घेणेची विनंती केली. त्यानुसार दोन दिवसांनी पाच लाख रुपये जादाची रक्कम परत घेतली. विलास भागवत यांनी ही बाब पोस्टाच्या निदर्शनास आणून दिली नसती तर हा प्रकार उघडकीस आला नसता असे पोस्टाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
विलास भागवत व त्यांची पत्नी सौ. संजीवनी भागवत यांनी जादा आलेली पाच लाख रुपयांची रक्कम प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल फलटण पोस्ट ऑफिसच्या पोस्ट मास्टर सौ. विजया खिलारे यांनी या प्रामाणिकपणाबद्दल विलास भागवत यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी फलटण पोस्ट ऑफिसचे ट्रेझरर शंकर सूर्यवंशी, असिस्टंट पोस्ट मास्तर भरत केंजळे, लेखनिक अश्‍विनी झगडे, दिपक मोरे व पोस्टातील अनेक कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

COMMENTS