Homeताज्या बातम्यादेश

मुलाकडे कोट्यवधींची संपत्ती असूनही भाकरीपोटी दाम्पत्याची आत्महत्या

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः हरयाणातील चरखी दादरी येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकार्‍याच्या आजी-आजोबांनी कुटुंबाच्या उदासीनतेला कंटाळून आत्म

जामखेड शहरात अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या
मुलीचा गळा आवळून बापाची आत्महत्या
हिंगोलीत शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः हरयाणातील चरखी दादरी येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकार्‍याच्या आजी-आजोबांनी कुटुंबाच्या उदासीनतेला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. या दाम्पत्याने बुधवारी रात्री आत्महत्या केली असून सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मुलांकडे 30 कोटींची संपत्ती आहे. पण पण ते आम्हाला दोन भाकरीही देत नाहीत, म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी माहिती दिली. जगदीश चंद्र (78) आणि भागली देवी (77) हे मूळचे गोपी येथील रहिवासी असून त्यांचा नातू हा 2021 च्या बॅचचा आयएएस अधिकारी आहे. जगदीश चंद्र आणि त्यांची पत्नी भागली देवी यांनी बुधवारी रात्री बाढरा येथील राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. रात्री अडीचच्या दरम्यान जगदीश चंद्र यांनीच पोलीस कंट्रोल रुमला विष प्राशन केल्याची माहिती दिली. जगदीश चंद्र यांनी खुद्द घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना सुसाइड नोट सोपवली. वृद्ध दाम्पत्याची प्रकृती खालावल्याने त्यांना प्रथम बाढरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना दादरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुसाईड नोटनुसार, मृत दाम्पत्याच्या मुलांकडे 30 कोटींची संपत्ती असूनही त्यांनी जेवण दिले नाही. कुटुंबाच्या उदासीनतेला कंटाळून आम्ही आत्महत्या केली. आता पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

COMMENTS