भोपाळ: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली. रातीगढ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्या नीलबड वसाहतीमधील शिवविहारम

भोपाळ: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली. रातीगढ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्या नीलबड वसाहतीमधील शिवविहारमध्ये पती-पत्नीचे मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत सापडले. तर त्यांची दोन मुलेदेखील मृतावस्थेत आढळली. त्यांना विष देऊन संपवण्यात आल्याची शक्यता आहे. दाम्पत्याने आधी मुलांना विष दिले. त्यानंतर गळफास लावून घेतला. कर्जाच्या ओझ्याखाली अडकल्याने कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली. पोलिसांना घरात एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात ऑनलाईन लोनमध्ये अडकून कर्जबाजारी झाल्याचा उल्लेख आहे.
COMMENTS