जामखेड : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नगरोत्यान अंतर्गत जामखेड शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या उजणी पाणी योजनेच्या कामाची व तलावाची नगराध्यक्षा, नगरसेवक, प्राधिकरणाचे आधिकारी ठेकेदार यांच्यासह संयुक्त थेट पाहणी केली आहे. यावेळी पाईपलाईनचे काम व कामात येणाऱ्या अडथळयांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच एक वर्ष भरात जामखेडला पाणी देण्याच्या दृष्टीने दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारांना दिल्या. यावेळी अमितभाऊ चिंतामणी,उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, पाणीपुरवठा समिती सभापती श्रीराम डोके, गटनेते नगरसेवक तात्याराम पोकळे, मोहन पवार, संजय काशिद, पवनराजे राळेभात, प्रविण सानप, गणेश डोंगरे, संतोष गव्हाळे, सागर टकले, प्रविण होळकर, नगरसेविका जया गव्हाळे, अशाबाई टकले, नंदाताई होळकर, सिमा कुलकर्णी, संग्राम पोले, मुख्याधिकारी अजय साळवे, पाणीपुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर मिसाळ, प्राधिकरणाचे अधिकारी राजेंद्र चौधरी, अनिल चव्हाण तसेच ठेकेदार कंपनी इगल इन्फ्राचे अनिल गुरूबक्सानी आदी उपस्थित होते. आता वर्षभरात जामखेडला पाणी : चिंतामणी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या जामखेड शहरातील नागरिकांसाठी उजनीवरून पाणी आणण्याच्या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या कामाला आता वेग येत आहे. पाईपलाईनचे एकूण ६६ किलोमीटर अंतराचे काम आहे त्यापैकी ५५ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ११ किलोमीटरमध्ये काही शेतकरी,वनविभाग, महाविजवितरण व अन्य तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी नगरपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेत आहे. जामखेड शहरवासीयांना नेहमीच भेडसावणारी पाणी टंचाईची व शुद्ध पाणी समस्या लवकरच कायमची संपवणार आहे असे नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी सांगितले. एकत्रित प्रयत्न करू : साळवे सदर कामाच्या काही ठिकाणी शेतकरी, खाजगी मालमत्ता धारकांशी संयुक्तपणे चर्चा करून मार्ग काढू व प्रशासकीय विभागांच्या जागा आहेत त्यांना पत्रव्यवहार झाला आहे. एकत्रित प्रयत्नातून लवकरात लवकर पाणी योजना मार्गी लावण्यासाठी सदर पहाणी केली आहे असे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगितले.

जामखेड : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नगरोत्यान अंतर्गत जामखेड शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या उजणी पाणी योजनेच्या कामाची व तलावाची नगराध्यक्षा, नगरसेवक, प्राधिकरणाचे आधिकारी ठेकेदार यांच्यासह संयुक्त थेट पाहणी केली आहे. यावेळी पाईपलाईनचे काम व कामात येणाऱ्या अडथळयांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच एक वर्ष भरात जामखेडला पाणी देण्याच्या दृष्टीने दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारांना दिल्या.
यावेळी अमितभाऊ चिंतामणी,उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, पाणीपुरवठा समिती सभापती श्रीराम डोके, गटनेते नगरसेवक तात्याराम पोकळे, मोहन पवार, संजय काशिद, पवनराजे राळेभात, प्रविण सानप, गणेश डोंगरे, संतोष गव्हाळे, सागर टकले, प्रविण होळकर, नगरसेविका जया गव्हाळे, अशाबाई टकले, नंदाताई होळकर, सिमा कुलकर्णी, संग्राम पोले, मुख्याधिकारी अजय साळवे, पाणीपुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर मिसाळ, प्राधिकरणाचे अधिकारी राजेंद्र चौधरी, अनिल चव्हाण तसेच ठेकेदार कंपनी इगल इन्फ्राचे अनिल गुरूबक्सानी आदी उपस्थित होते.
आता वर्षभरात जामखेडला पाणी : चिंतामणी
सभापती प्रा. राम शिंदे यांच्या जामखेड शहरातील नागरिकांसाठी उजनीवरून पाणी आणण्याच्या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या कामाला आता वेग येत आहे. पाईपलाईनचे एकूण ६६ किलोमीटर अंतराचे काम आहे त्यापैकी ५५ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ११ किलोमीटरमध्ये काही शेतकरी,वनविभाग, महाविजवितरण व अन्य तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी नगरपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेत आहे. जामखेड शहरवासीयांना नेहमीच भेडसावणारी पाणी टंचाईची व शुद्ध पाणी समस्या लवकरच कायमची संपवणार आहे असे नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी सांगितले.
एकत्रित प्रयत्न करू : साळवे
सदर कामाच्या काही ठिकाणी शेतकरी, खाजगी मालमत्ता धारकांशी संयुक्तपणे चर्चा करून मार्ग काढू व प्रशासकीय विभागांच्या जागा आहेत त्यांना पत्रव्यवहार झाला आहे. एकत्रित प्रयत्नातून लवकरात लवकर पाणी योजना मार्गी लावण्यासाठी सदर पहाणी केली आहे असे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगितले.

COMMENTS