Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्लास्टिक  सर्जन्सची शनिवारपासून परीषद 

नाशिक : तंत्रज्ञानाचा सर्वत्र वापर वाढत असतांना वैद्यकीय क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तंत्रज्ञानावर आधारित शास्त्र

वसंत रांधवण यांना निर्भिड पत्रकार पुरस्कार जाहीर
क्रिकेटपटू ऋषभ पंत अपघात गंभीर जखमी
शाहू महाराजांचे कार्य दिशादर्शक : प्रमोद गायधनी

नाशिक : तंत्रज्ञानाचा सर्वत्र वापर वाढत असतांना वैद्यकीय क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तंत्रज्ञानावर आधारित शास्त्र असलेल्या प्लास्टिक सर्जरीतील आधुनिक प्रक्रियांची माहिती देण्यासाठी परीषदेचे आयोजन नाशिक मध्ये  केले आहे. प्लास्टिक सर्जन्स असोसिएशन ऑफ नाशिक यांच्यातर्फे महा असोसिएशन ऑफ प्लास्टिक सर्जन्स ह्यांची  मिडटर्म सीएमई कॉनटुरस नाशिक २०२३ परीषद येत्या शनिवार आणि रविवार दि  २८ व २९ ऑक्टो   रोजी हॉटेल एसएसके सॉलीटीअर येथे घेतली जाणार आहे.

या परीषदेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परीषदेला प्लास्टिक सर्जन्स असोसिएशन ऑफ नाशिकचे अध्यक्ष आणि परीषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र नेहेते, असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि परीषद आयोजन समितीचे सचिव डॉ.दयानंद एल. एम. आणि असोसिएशनचे सचिव व खजिनदार आणि परीषद आयोजन समितीचे सहसचिव डॉ.किरण नेरकर उपस्थित होते.

डॉ.राजेंद्र नेहेते म्हणाले, या परीषदेत ’लायपोसक्शन  आणि  बॉडी रिशेपिंग’ या विषयाशी निगडीत शस्त्रक्रियांचे प्रक्षेपण करत सहभागी डॉक्टरांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच प्रात्येक्षिकांवर आधारित व्याख्यानांचे आयोजन या परीषदेत केलेले आहे.

डॉ.किरण नेरकर म्हणाले, महा असोसिएशन ऑफ प्लास्टिक सर्जन्स यांच्या सहकार्याने प्लास्टिक सर्जन्स असोसिएशन ऑफ नाशिक यांच्या वतीने ही परीषद आयोजित केली आहे. परीषदेत प्रामुख्याने ककुना क्लिनिक , दुबई येथील प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ.संजय पाराशर,  डॉ श्रीरंग पंडित ( पुणे ) , डॉ.आशिष धवलभक्त,डॉ.मेधा भावे ( मुंबई ) डॉ.वरुन दीक्षित  हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहाणार आहेत. राज्यभरातील प्लास्टिक सर्जन्स या परीषदेत सहभागी होऊन उपचार पद्धतीतील आधुनिक ज्ञान आत्मसात करणार आहेत.

या परिषदेसाठी डॉ. सुधीर करमरकर, डॉ. आतिष बोरोले, डॉ. सचिन वाघ, डॉ. गणेश चौधरी, डॉ. निलेश पाटील, डॉ. सपना नेरे, डॉ. गौतम गांगुर्डे, डॉ. ललित डेर्ले, डॉ. अमित जाधव, डॉ. मनोज बच्छाव, डॉ. अभिषेक भामरे, डॉ. प्रशांत मुन, डॉ. प्रदीप कुलाल, डॉ. स्वप्निल ढाके, डॉ. अभिषेक कुलकर्णी, डॉ. प्रणित मानकरे, डॉ. नेहा जैन, डॉ. आनंद दुगड, डॉ. राजेंद्र धोंडगे, डॉ. सचिन महाडिक मेहनत घेत आहेत.

COMMENTS