Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत – रविकांत तुपकर

बुलढाणा प्रतिनिधी - कापूस उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्यांनी भाव न मिळाल्यामुळे साठवून ठेवला आहे. केंद्र स

हिंगणीमध्ये विजेच्या धक्क्याने युवक ठार
मांडओहळ धरण सलग तिसऱ्या वर्षी ‘ओव्हर फ्लो’
 कापसाचे दर वाढवण्यात यावे; शेतकऱ्यांची प्रशासनाला मागणी

बुलढाणा प्रतिनिधी – कापूस उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्यांनी भाव न मिळाल्यामुळे साठवून ठेवला आहे. केंद्र सरकारचे धोरण शेतकऱ्यांन विरोधात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. कॉटन लॉबीच्या दावाखाली केंद्र सरकारने येऊ नये. कापसावरचे आयात शुल्क स्थिर ठेवावे आणि केंद्र सरकारने कापूस आयात करू नये. कापसाच्या आणि सुताच्या उद्योगाला केंद्र सरकारने चालना दिली पाहिजे अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. केंद्र सरकार जर कापूस उत्पादकांच्या विरोधात जात असेल तर केंद्र सरकारच्या विरोधात आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसाव लागेल. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

COMMENTS