Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर येथे ब्राह्मण महाअधिवेशनात नांदेडचे नगरसेवक आशिष नेरलकर यांचा सत्कार

नांदेड । प्रतिनिधीब्राह्मण समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीच्या उद्देशाने आयोजित भव्य ब्राह्मण महाअधिवेशन रविवारी (दि. 1 फेब्रुवारी 202

नांदेड जिल्हात आचार संहिता लागू
जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांचा मनमानी कारभार; सीईओंच्या अधिकारांचा परस्पर वापर!
शिक्षण विभागात ‘पेन्शन थांबवा – कमिशन चालवा’ योजना?

नांदेड । प्रतिनिधी
ब्राह्मण समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीच्या उद्देशाने आयोजित भव्य ब्राह्मण महाअधिवेशन रविवारी (दि. 1 फेब्रुवारी 2026) मंथन हॉल, एमआयटी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनात नांदेड येथील भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक आशिष नेरलकर यांचा समाजातर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
अधिवेशनाची सुरुवात ध्वजपूजन व दीपप्रज्वलनाने झाली. पहिल्या सत्रात विवेक देशपांडे यांनी मार्गदर्शन केले, तर केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला. त्यांनी महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात विविध ठिकाणच्या नव-निर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सामूहिक सत्कार करण्यात आला. अधिवेशनात समाज संघटन, शिक्षण, रोजगार व विकासविषयक ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी कॅप्टन आशिष दामले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास निखिल लातूरकर, प्रवीण कुलकर्णी, महेंद्र इटोलीकर, आदित्य डोईफोडे यांच्यासह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS