Homeताज्या बातम्यासंपादकीय

पुन्हा कोरोनाचे सावट

काही वर्षांपूर्वी कोरोनाच्या नावाच्या राक्षसाने संपूर्ण जगात हाहाकार माजवून टाकला होता. लाखो जणांना या राक्षसाने गिळंकृत केले. मात्र बदल हा निसर्

वेळकाढूपणामुळेच आजची परिस्थिती
जातीनिहाय जनगणना आणि आरक्षण
विधिमंडळाच्या संस्कृतीला न शोभणारे वर्तन

काही वर्षांपूर्वी कोरोनाच्या नावाच्या राक्षसाने संपूर्ण जगात हाहाकार माजवून टाकला होता. लाखो जणांना या राक्षसाने गिळंकृत केले. मात्र बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळेच या कोरोनाच्या राक्षसावर मात करण्यात आपण यशस्वी झालो. यशस्वीरित्या संशोधन होऊन विविध देशांनी लस तयार करून, या कोरोनाच्या लाटेला आपण थोपवू शकलो. मात्र देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाची ही लाट वाढू नये, यासाठी सर्वच देशातील आरोग्य यंत्रणा कामाला लागल्या आहेत. अनेकांनी यापूर्वीच कोरोनाच्या लसी घेतल्यामुळे कोरोनाचा इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरू शकत नाही. मात्र कोरोनाचे रुग्ण ज्या वेगाने वाढत आहे, ते बघता केंद्र सरकार सध्य अलर्ट मोडवर असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडविया यांनी संपूर्ण राज्यातील आरोग्य मंत्र्यांची ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन कोरोनाच्या संदर्भात अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत. केरळमध्ये 300 नवीन रुग्ण आढळले आहेत तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात 24 तासांमध्ये कोरोनाच्या 358 नव्या रुग्णांची नोदं झाली असून त्यातील 300 रुग्ण एकट्या केरळमधील आहेत. या कालावधीत देशभरात 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या कर्नाटकमध्ये 2, पंजाबमध्ये 1 आणि केरमधील 3 रुग्णांचा समावेश आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 2669 वर पोहचली आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. वी. के पॉल यांनी कोविड 19 चा उपप्रकार जेएन 1 च्या वाढत्या प्रकराबद्दल म्हटले आहे की, जेएन 1 च्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत असून नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. देशभरात आतापर्यंत जेएन 1 प्रकरणांची 21 रुग्ण आढळून आले. कोविड 19 जेएन संपर्कात आलले 92 टक्के रुग्ण घरातच उपचार घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतातील वैज्ञानिक समुदाय या नवीन प्रकाराचा बारकाईने अभ्यास करत आहे. राज्यांनी चाचण्या वाढवण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून केरळ, महाराष्ट्र, झारखंड आणि कर्नाटकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहेत. या देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोना रुग्णांत वाढ होण्याच्या आधीच महत्वपूर्ण खबरदारी घेऊन उपाययोजना करण्याची खरी गरज आहे. तीन वर्षांपूर्वीच राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला होता. लोकांचे जीवन पूर्णपणे बदलले. कोरोनामुळे घरातून बाहेर पडणे देखील शक्य नव्हते. शाळा, कॉलेज, ऑफिस बंद अशी स्थिती संपूर्ण देशात बघायला मिळाली. अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर, अनेकांना बेरोजगाव व्हावे लागले, अनेकांना उद्योगधंद्यात मोठा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे कोरोनाचे जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रचंड असा परिणाम बघायला मिळाला. मात्र तीन वर्षांपूर्वीच्या दुखःद आठवणी आता विस्मृतीत गेल्या असून, सर्व काही सुरळीत सुरू आहे. जगातल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेने उभारी घेतली आहे, अनेकांना रोजगार मिळाले आहे, अनेकजण आपल्या व्यवसायात स्थिर-स्थावर होतांना दिसून येत आहे. त्यामुळे अशावेळी कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढतांना दिसून येत आहे. मात्र कोरोनाने डोकवर काढण्याआधीच पुरेशी खबरदारी घेऊन त्याला डोके वर काढू देण्याची खरी गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने अलर्ट राहण्याची खरी गरज आहे. 

COMMENTS