Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशकात पार पडला व्हॉईस ऑफ मिडीयाचा अधिवेशन सोहळा 

नाशिक प्रतिनिधी - नाशिक येथील गरुड झेप अकॅडमीच्या सभागृहात उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन आयोजित करण्यात आले. या अधिवेशनाचे प्रमुख वक्ते माणून

अंकिताला मिळालेला न्याय हा न्यायव्यवस्थेचा विजय – पालकमंत्री सुनील केदार
राज्यात राज्यपाल बदलाचे वारे
सप्टेंबर महिन्यापासून मिळू शकते लहान मुलांना लस ?

नाशिक प्रतिनिधी – नाशिक येथील गरुड झेप अकॅडमीच्या सभागृहात उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन आयोजित करण्यात आले. या अधिवेशनाचे प्रमुख वक्ते माणून राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे होते. व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, अजित कुंकलोळ, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल महस्के, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती नदवी, प्रदेश महिला संघटक बास्मिन शेख, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष दिंगबर महाले, गजेंद्र मेंढी, गुजरातचे प्रदेश उपाध्यक्ष जिग्रेश जोशी, रेडिओ किंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख, नाशिक जिलाध्यक्ष कुमार कडलग, जिल्हा प्रवक्ते प्रमोद दंडगव्याळ, संघटक भगवान थोरात, लक्ष्मण डोळस आदी उपस्थित होते.

अधिवेशनाच्या सुरुवातीला डिंगबर महाले यांनी प्रास्ताविकातून व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे महत्व पटवून दिले. राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे म्हणाले की, व्हॉईस ऑफ मीडिया सकारात्मक पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून असलेली संघटना एका गावापासून सुरू होऊन ४९ देशात गेली आहे. संस्था म्हणजे माझे घर असे समजून प्रत्येक पत्रकार जुळत गेला संघटनेचे देशभरात एक लाख ७६ हजार सदस्य झाले आहेत. पुढील पाच वर्षांत पत्रकारितेत बदल होईल. पत्रकारितेसाठी मिळणाऱ्या पदवीमध्ये बदल होणे आवश्यक आहे. पुढील दोन वर्षात १४८ देशात व्हॉईस ऑफ मीडियाचे संघटन करायचे आहेत. उत्तर महाराष्ट्र अधिवेशनानिमित्त संवाद कौशल्य असलेली मंडळी एकत्र आले याचा अभिमान आहे. संघटनेचे नाव कसे उज्वल होईल, यादृष्टीने प्रत्येकाने काम करणे गरजेचे आहे. या संघटनेचे यशस्वी काम ते पुढील पिढीसाठी उपयोगात येईल, असेही संदीप काळे यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी सांगितले की, पत्रकारांचे अनेक प्रश्न असून त्यावर मात करण्यासाठी व्हॉईस ऑफ मोडिया पंचसूत्री तयार करून काम करीत आहे. अडचणी येतात तरीही मंदीप काळे व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी कार्य करीत आहे. पत्रकारांच्या १४३ संघटनांमध्ये व्हॉईस ऑफ मीडिया ही १४४ वी संघटना स्थापन होऊन संघटन मजबूत करण्यास व्हाईस ऑफ मीडियाला यश आले आहे. पत्रकारांचे घर व आरोग्य अशा विषयांवर व्हॉईस ऑफ मीडिया काम करीत आहे. पत्रकार आर्थिक दृष्ट्या सदृढ कुन्द झाल्यास ते चांगल्या पद्धतीने पत्रकारिता करू शकतात व लढूही शकतात. पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ अशी वल्गना करतात, परंतु प्रत्यक्षात चौधास्तंभ अडचणींचा सामना करतो, असे सांगितले.

या अधिवेशनात व्हॉइस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीम संघटकपदी अशोक वानखेडे यांची नियुक्ती करून राष्ट्रीय अध्यक्ष संदोष काळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नवनियुक्त राष्ट्रीय संघटक अशोक वानखेडे यांनी अधिवेशनाला उपस्थित सदस्यांना संघटनेची शपथ दिली.

उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशनात पत्रकारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक किट वाटपाचा राज्यस्तरीय शुभारंभ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. व्हॉईस ऑफ मीडिया नाशिक जिल्हा कार्यकारिणीने तयार केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या अधिणेशनाला व्हॉईस ऑफ मीडियाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी, सदस्य पत्रकार उपस्थित होते. सूत्रसंचालन विठ्ठल भाडमुखे आणि अश्विनी पुरी यांनी केले. पहिल्या सत्राचे आभार दिलीप साळुंखे यांनी मानले, अधिवेशन यशस्वीतेसाठी नाशिक जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS