देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेच्या परवानगीवरून शुक्रवारी नगरपालिकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले.
देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेच्या परवानगीवरून शुक्रवारी नगरपालिकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले. बाजारतळ मैदान आधीच दुसऱ्या राजकीय पक्षासाठी आरक्षित असल्याने जागा देता येणार नसल्याचे बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता अभिषेक सुतावणे यांनी स्पष्ट केले असता, वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रसाद सांगळे यांनी त्यांना शिवीगाळ करत बुटाने मारण्याची भाषा केल्याने याच्या निषेधार्थ नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. तसेच, सांगता सभेसाठी जागा नाकारल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेसाठी उमेदवार प्रसाद सांगळे यांनी दुपारी ३ वाजता परवानगीसाठी अर्ज सादर केला होता. मात्र सकाळची वेळ उपलब्ध असतानाही, आधीच एका पक्षाला परवानगी दिलेल्या वेळेसाठी अरेरावी केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अनिल जाधव यांनी सांगितले की, सुरुवातीला १८ तारखेपर्यंत सांगता सभा घेण्याची मुदत होती. मात्र १७ तारखेला आलेल्या नव्या परिपत्रकानुसार १९ तारखेपर्यंत सभा घेण्यास मुभा देण्यात आली. १९ तारखेसाठी ९ तारखेलाच अर्ज कसा स्वीकारण्यात आला, असा सवाल केला असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला जाणीवपूर्वक अडथळा आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अखेर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत सकाळच्या वेळेत सभा घेण्याची विनंती करून नियमानुसार परवानगी घेण्याचे निर्देश दिल्याने वादावर तात्पुरता पडदा पडला.
या आंदोलनात नगरपालिकेचे देवळाली प्रवरा नगर पालिके कार्यालयीन दिपक जग्रवाल,अध्यक्ष अभियंता दिनकर पवार,तुषार सुपेकर,भुषण नवाल,स्वप्निल फड, भुषण झरकर,निखिल नवले,अमोल जाधव,सुनिल गोसावी संभाजी वाळके,वैभव ठोंबरे,स्वाती आरोटे, कृष्णा महांकाळ,अमोल कांबळे,सुदाम कडू,विजय साठे, सारंगधर टिक्कल,अजय कासार,राजेंद्र हारगुडे,सागर होले,रोहित पंडीत,राजेंद्र कदम,राजेंद्र चव्हाण,अश्विनी भांगरे,सुभाष कुलट,दिपक वाळूंज, सोमनाथ सुर्यवंशी,गोरख भांगरे,नंदकुमार शिरसाठ,बाळासाहेब चव्हाण आदींसह ठेकेदारीवरील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके, एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव, तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव राजेंद्र आढाव आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रसाद सांगळे उपस्थित होते.

COMMENTS