Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठी साहित्य संमेलनात वादाची ठिणगी

काळ्या कपड्यांवरून लेखक प्रवीण कोकरेंना प्रवेश नाकारलासातारा ः सातार्‍यात सुरू झालेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने मराठी साहित्यवि

Satara : घरगुती भांडणातून १० घर पेटली (Video)
चंदगड : चंदगड तालुक्यात स्वच्छतारूपी गांधी जयंती साजरी (Video)
Lonand : लोणंद शहरातील रेल्वे स्थानकामध्ये अंधाराचे साम्राज्य (Video)

काळ्या कपड्यांवरून लेखक प्रवीण कोकरेंना प्रवेश नाकारला
सातारा ः सातार्‍यात सुरू झालेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने मराठी साहित्यविश्‍वात उत्साहाचं वातावरण निर्माण केले आहे. साहित्यिक, वाचक आणि मराठीप्रेमींच्या उपस्थितीत शुक्रवारी संमेलनाचा अधिकृत प्रारंभ झाला. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन, ध्वजवंदन आणि ग्रंथदिंडीसारख्या उपक्रमांमुळे शहर साहित्यिक रंगात रंगून गेले. मात्र, या आनंदोत्सवाला पहिल्याच दिवशी एका वादग्रस्त घटनेची किनार लाभली.
उद्घाटन समारंभासाठी आलेल्या एका युवा लेखकाला केवळ काळे कपडे परिधान केल्यामुळे कार्यक्रमस्थळी प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा युवक अन्य कोणी नसून युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक प्रदीप कोकरे असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर या घटनेची तीव्र दखल घेतली जात आहे.
लेखक कोकरे यांनी या संदर्भात सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रमस्थळी प्रवेश करताना पोलिसांनी काळ्या कपड्यांचं कारण देत त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. प्रवेश का नाकारला, अशी विचारणा केली असता, ‘वरिष्ठांचे आदेश आहेत,’ असं उत्तर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. कार्यक्रमादरम्यान कुणी निषेध व्यक्त करू नये, यासाठी काळे कपडे घातलेल्या व्यक्तींना रोखण्याच्या सूचना असल्याचंही सांगण्यात आल्याचं कोकरे यांनी नमूद केलं आहे. या घटनेनंतर साहित्य क्षेत्रात आणि सामाजिक माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. साहित्य संमेलन हे मुक्त विचार, मतस्वातंत्र्य आणि वैचारिक संवादाचं व्यासपीठ मानलं जातं. अशा ठिकाणी कपड्यांच्या रंगावरून एखाद्याचा प्रवेश रोखणं कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेषतः एका पुरस्कारप्राप्त लेखकाला अशा पद्धतीनं अडवण्यात आलं, ही बाब अनेकांना अस्वस्थ करणारी असल्याचं साहित्यिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.

COMMENTS