पाथर्डी /प्रतिनिधीः महाविद्यालयीन विद्यार्थीही सोशल मिडियाच्या महाजालात गुरफटून गेली आहे. या आभासी जगात युवकांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे.या
पाथर्डी /प्रतिनिधीः महाविद्यालयीन विद्यार्थीही सोशल मिडियाच्या महाजालात गुरफटून गेली आहे. या आभासी जगात युवकांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे.या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी व आदर्श व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी निरंतर वाचन महत्वाचे आहे. असे महत्वपुर्ण वक्तव्य पाथर्डीभूषण बालरोगतज्ञ डॉ. ललित गुगळे यांनी केले.
ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ग्रंथोत्सव -2023 च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अभय आव्हाड, उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, नंदकुमार शेळके, प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, पत्रकार अविनाश मंत्री, राजेंद्र सावंत, श्री. विवेकानंद विद्यामंदिरचे मुख्याध्यापक शरद मेढे आदी उपस्थित होते. डॉ. गुगळे पुढे म्हणाले की,प्रत्येक शाळा-महाविद्यालयांमधून मुलांना दररोज एक तास मुक्तपने वाचन करण्याचा आनंद मिळावा.त्यांना त्यावेळी त्यांच्या आवडीची पुस्तके मिळावीत.प्रत्येक शाळा महविद्यालयात पुस्तक प्रदर्शन आयोजित करणे, आवडीच्या लेखकांची व्याख्याने मुलाखती आयोजित करणे,त्यांना बोलते करणे गरजेचे आहे. सुसंस्कृत समाजाचा पाया चांगल्या आणि दर्जेदार वाचनात असून, बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी पुस्तकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. मोबाईल व इंटरनेटच्या युगात नवी पिढी वाचनापासून दूर जात आहे.हरवलेली वाचन चळवळ फुलविण्यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती पुन्हा रुजवावी.असे ते शेवटी म्हणाले.यावेळी महाविद्यालयात भव्य स्वरुपात ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणेनी केले. तर सुत्रसंचालन डॉ. अभिमन्यू धोरमारे तर आभार ग्रंथपाल डॉ.किरण गुलदगड यांनी मानले. अभय आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य खुली राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. यावेळी डॉ.शिरीष जोशी, डॉ.मृत्युंजय गर्जे, प्रा. रमेश मोरगावकर,बंडूशेठ दानापुरे,बबन सबलस,राहुल तरवडे,ज्ञानेश्वर कोकाटे,शिवाजी बालवे,पप्पू नरवणे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अतुल बर्डे,दयाराम गायकवाड,रोहित बिन्नर या नाशिकच्या खेळाडूंनी पहिले तीन क्रमांक पटकावले. त्यांच्या पारितोषिक वितरणासाठी पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर साहेब उपस्थित होते. राष्ट्रीय खेळाडू तुकाराम मरकड आणि किशोर मरकड यांचे मॅरेथॉन स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य लाभले. आजच्या अनुभवातून आगामी काळात पाथर्डी शहरात व्यापक आणि भव्य मॅरेथॉन आयोजनाचा मानस अभय आव्हाड यांनी व्यक्त केला. पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोय टाळण्यासाठी वाढदिवसानिमित्त अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानतर्फे ऑक्सिजन सिलिंडर ट्रॉली भेट म्हणून देण्यात आल्या. यावेळी उपस्थित डॉ.मनिषा खेडकर,रवींद्र भोईटे,गणेश विधाते, आदिनाथ भोईटे, आण्णा हारेर, शाहनवाज शेख, कृष्णा रेपाळ, बडे साहेब धनंजय थोरात उपस्थित होते. पाथर्डी शहरातील पुजारी बांधवांचा सन्मान सोहळा हरिओम रासने आणि रामनाथ बंग यांच्या शुभहस्ते महाविद्यालयात संपन्न झाला.
COMMENTS