Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत जनार्दन स्वामी विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम

चांदवड प्रतिनिधी - संत जनार्दन स्वामी विद्यालय गंगावे ता.चांदवड  येथील इयत्ता १० वी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी

पंतप्रधान मोदींचा मेट्रोला हिरवा झेंडा
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या गेटला कुलप कोणाचे ?

चांदवड प्रतिनिधी – संत जनार्दन स्वामी विद्यालय गंगावे ता.चांदवड  येथील इयत्ता १० वी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी यशाची गरुडझेप घेत यावर्षी ही परंपरा कायम राखली इ .१० वी चा निकाल ९६.०७  % लागला असून ९०.९६ % गुण मिळवून कु.उशीर अश्विनी अंबादास हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर ८९.०० % मिळवून कु. थोरमिसे साक्षी जिभाऊ हि द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली तसेच तृतीय क्रमाक  कु. बिडगर पायल गोरख ८८.०० %  गुण मिळवून प्राप्त केला.  तर चतुर्थ क्रमांक आंग्रे ऋतुजा राजेंद्र हिने ८६.६० % मिळवत यश संपादन केले आणि पंचम क्रमांक कुमारी अहिरे शालिनी कौतिक हीस ८६.००% मिळाले. १० वी च्या सर्व विद्यार्थ्यानी विशेष प्राविण्य संपादन केलेले आहे.यावेळी सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक श्री सुनील रामकृष्ण शेलार  तसेच संस्थेचे मुख्याध्यापक श्री व्ही.के. सोनवणे , सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी  कौतुक केले असून भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षक, कर्मचारी वृंद, पालक शिक्षक संघ सदस्य तसेच परिसरातील जनतेने अभिनंदन केले आहे.

COMMENTS