स्पर्धकाची पत्नी म्हणाली अमिताभ बच्चनचे चित्रपट ‘फालतू’

Homeताज्या बातम्यामनोरंजन

स्पर्धकाची पत्नी म्हणाली अमिताभ बच्चनचे चित्रपट ‘फालतू’

ऐकून बिग बींनी मारला कपाळावर हात

कौन बनेगा करोडपती शोच्या या सीझनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक त्यांच्या खेळातून लोकांची मने जिंकत आहेत. पण त्याचबरोबर त्यांचे मजेदार किस्सेसुद्धा चांगल

अमिताभ बच्चन यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात पार पडली अँजिओप्लास्टी
अमिताभ बच्चन यांच्या ‘उचाई’ चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर रिलीज.
बिग बी- रश्मिकाच्या ‘गुडबाय’चा धमाल ट्रेलर प्रदर्शित

कौन बनेगा करोडपती शोच्या या सीझनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक त्यांच्या खेळातून लोकांची मने जिंकत आहेत. पण त्याचबरोबर त्यांचे मजेदार किस्सेसुद्धा चांगलेच लोकप्रिय होतात. या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. शोच्या नवीन प्रोमोमध्ये हॉट सीटवर बसलेला स्पर्धक म्हणतो कि, ‘सर बायकोची तक्रार आहे, ती म्हणते की मी तिच्यावर प्रेम करत नाही.’ यावर अमिताभने कारण विचारले, ज्याचे कारण देताना स्पर्धक कृष्णा दास म्हणतो कि, ‘सर, मी तुमचा चित्रपट पाहतो तेव्हा बायको म्हणते तुम्ही काय फालतू पिक्चर बघत आहात’. हे ऐकताच अमिताभ बच्चन यांना धक्काच बसला आणि त्यांनी कपाळाला हात लावला. पुढे तो स्पर्धक म्हणतो कि, ‘पण मी त्या चित्रपटाचे नाव सांगणार नाही’, त्यावर अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांनी मजेशीर उत्तर दिले. ते म्हणतात की, ‘आधी मला ही गोष्ट पचवू द्या.’ या मजेशीर प्रोमोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्याला खूप पसंती दिली जात आहे. .

COMMENTS