वर्धा प्रतिनिधी - वर्धा जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) येथे मागील अनेक दिवसांपासून शहरातील नदी पलीकडील वार्ड क्रमांक 2 व 3 मध्ये घरगुती नळाद्वार
वर्धा प्रतिनिधी – वर्धा जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) येथे मागील अनेक दिवसांपासून शहरातील नदी पलीकडील वार्ड क्रमांक 2 व 3 मध्ये घरगुती नळाद्वारे गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी नगर परिषद सिंदी कार्यालयाला वारंवार लेखी तक्रारी दिल्यात परंतु अद्याप ही या गंभीर समस्ये वर कोणत्याही संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. परिणामी, येत्या दोन दिवसात या भागातील गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याची समस्या सोडविली नाही, तर भव्य मोर्चा स्थानिक नगर पालिकेवर काढून आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. शहराला दहा किलोमीटर अंतरा वरून बाकसूर येथून पाणी पुरवठा केला जातो. दर दोन दिवसांनी भाग बदलत वार्डातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. सिंदी कांढळी रोडचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याच्या खोदकामात महिन्यातून किमान दोनदा तरी जलपुरवठा करणारी पाईपलाईन फुटत असून पाईप लाईन दुरुस्तीचे काम पूर्ण होई पर्यंत व्यवस्थित व सुरळीत शहराला पाणीपुरवठा होत नाही. मागील अनेक दिवसांपासून शहरातील नदी पलीकडील वार्ड क्रमांक 2 व 3 मध्ये घरगुती नळाद्वारे गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने मुख्यतः पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. या गढूळ पाण्यामुळे या भागातील नागरिकांचे व लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे काही दिवसांपासून उलटी, मळमळ, पोटदुखी व तापाचे प्रमाण वाढले आहे. या संदर्भात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. परंतु, या गंभीर समस्येकडे कोणीही लक्ष पुरवायला तयार नाही. मागील आठवड्यात सिंदी नगर पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी यांना या भागातील नागरिकांनी माहीती दीली . परंतु त्याचा काही फायदा झाली नाही. परिणामी, येत्या दोन दिवसात गढूळ व दुर्गंधीयुक्त पाण्याची समस्या निकाली निघाली नाही तर नगरपलिकेवर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा वार्ड क्रमांक 2 व 3 मधील नागरिकांनी दिला आहे.
COMMENTS