कृषिपंप वीज देयकांच्या दुरुस्ती शिबिराला ग्राहकांचा प्रतिसाद ; अहमदनगर जिल्ह्यात ८५२ ग्राहकांचा सहभाग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषिपंप वीज देयकांच्या दुरुस्ती शिबिराला ग्राहकांचा प्रतिसाद ; अहमदनगर जिल्ह्यात ८५२ ग्राहकांचा सहभाग

अहमदनगर : महावितरणच्या अहमदनगर मंडळामध्ये ११ मार्च रोजी तालुकानिहाय व उपविभागनिहाय महावितरणच्या उपविभागीय कार्यालयामध्ये कृषीपंप वीज देयकाच्या दुरुस्

ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्य सचिवपदी राजेंद्र वाघमारे
प्रभाग 11 मधील पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा मनपात ठिय्या आंदोलन – अविनाश घुले
साखर सम्राटांपुढे निलेश लंकेंचे लोकसभेला आवाहन l Nilesh lanke l LokNews24

अहमदनगर : महावितरणच्या अहमदनगर मंडळामध्ये ११ मार्च रोजी तालुकानिहाय व उपविभागनिहाय महावितरणच्या उपविभागीय कार्यालयामध्ये कृषीपंप वीज देयकाच्या दुरुस्तीसाठी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. अहमदनगर मंडळातील ८५२ ग्राहकांनी सहभाग नोंदविला असून यामध्ये प्राप्त ६८४ तक्रारींपैकी ५६८ ग्राहकांची वीजबिले जागेवरच दुरुस्त करून देण्यात आली. कृषी पंप वीज देयकाच्या थकबाकी मधील २३ लाख ५७ हजार रुपयांचा भरणा सुद्धा ग्राहकांनी शिबिरात केला.

सदर वीज बिल दुरुस्ती शिबीर हे शुक्रवारी ११ मार्च रोजी अहमदनगर मंडळातील अहमदनगर ग्रामीण, अहमदनगर शहर, कर्जत, संगमनेर व श्रीरामपूर विभागाअंतर्गत उपविभागामध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये अहमदनगर ग्रामीण विभागात ११३ ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात प्राप्त ४७ ग्राहकाच्या तक्रारीपैकी २७ ग्राहकाच्या तक्रारींचे निराकरण केले असून ग्राहकांनी यावेळी ४ लाख ६३ हजार रुपयांचा भरणाही यावेळी केला. अहमदनगर शहर विभागात २२० ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात प्राप्त २२० ग्राहकाच्या तक्रारीपैकी सर्वच ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण केले असून ग्राहकांनी यावेळी ३ लाख ३३ हजार रुपयाचा भरणा केला. कर्जत विभागात १३२ ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात प्राप्त १३२ ग्राहकाच्या तक्रारीपैकी ९४ ग्राहकाच्या तक्रारींचे निराकरण केले असून ग्राहकांनी यावेळी ६ लाख ५८ हजार रुपयांचा भरणाही यावेळी केला. संगमनेर विभागात २२४ ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात प्राप्त ७३ ग्राहकाच्या तक्रारीपैकी सर्वच तक्रारींचे निराकरण केले असून ग्राहकांनी यावेळी ६ लाख ४२ हजार रुपयांचा भरणाही यावेळी केला. श्रीरामपूर विभागात १६३ ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात प्राप्त १६३ ग्राहकाच्या तक्रारीपैकी १५४ तक्रारींचे निराकरण केले असून ग्राहकांनी यावेळी २ लाख ६१ हजार रुपयांचा भरणाही यावेळी केला. असे एकूण अहमदनगर मंडळात ८५२ ग्राहकांनी सहभाग नोंदविला त्यात ५६८ ग्राहकाच्या तक्रारींचे निराकरण केले असून ग्राहकांनी यावेळी २३ लाख ५७ हजार रुपयांचा भरणाही यावेळी केला. शिबीर यशस्वी करण्यासाठी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर आणि अहमदनगर मंडळाचे अधिक्षक अभियंता सुनिल काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते, अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र यांनी परिश्रम घेतले.

कृषी ग्राहकांच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व समावेशक कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२० जाहीर केले आहे. यानुसार थकबाकीदार कृषिपंप धारकांना वीजदेयकाची थकबाकी भरतांना निर्लेखनाद्वारे तथा व्याज व विलंब आकारामध्ये सूट दिली आहे. मात्र या योजनेत बिले भरतांना वीज बिले दुरुस्त करून देण्याची मागणी महावितरणला प्राप्त झाली होती त्यानुसार शिबीर आयोजित करण्यात आले होते.

COMMENTS