Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोले तहसीलमध्ये मंगळवारी ग्राहक दिनाचे आयोजन

अकोले : येथील तहसील कार्यालय व अकोले ग्राहक पंचायत शाखेच्या वतीने मंगळवारी (दि.१७) सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्रा

संवत्सर महानुभाव आश्रमाच्या विकास कामांना मान्यता
अकोल्यात घरगुती गॅसचा काळाबाजार वाढला
क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती उत्साहात

अकोले : येथील तहसील कार्यालय व अकोले ग्राहक पंचायत शाखेच्या वतीने मंगळवारी (दि.१७) सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांच्या विविध विभागातील असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार असल्याचे ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, तालुका अध्यक्ष दत्ता शेणकर, कार्याध्यक्ष महेश नवले यांनी दिली. ग्राहक दिनांत यापूर्वी अनेक ग्राहकांना न्याय देण्याचा प्रयत्न तहसील कार्यालय व ग्राहक पंचायतीच्या वतीने केला गेलेला आहे.

यामध्ये शासकीय विविध दाखले, रेशनपुरवठा, वीजपुरवठा, वीज बिले, शहरी व ग्रामीण भागात गॅस पुरवठा, बी बियाणे, कृषी खते, वन खाते, कृषी खाते, पंचायत समिती, शिक्षण विभाग यासंह सर्वच विभागातील समस्या यांची सोडवणूक होणार आहे. या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, नायब तहसीलदार किसन लोहारे, महसूल विभागाचे नायब तहसीलदार प्रमोद सावंत यांसह विविध अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

COMMENTS