बुलढाणा प्रतिनिधी- बुलढाणा जिल्ह्यातील चिखली - मेहकर या ३९ किलोमीटर असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँग्रेटचे बांधकाम २०३ कोटी रुपये खर

बुलढाणा प्रतिनिधी– बुलढाणा जिल्ह्यातील चिखली – मेहकर या ३९ किलोमीटर असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँग्रेटचे बांधकाम २०३ कोटी रुपये खर्च करून दोन वर्षांपूर्वीच करण्यात आले, मात्र जे एम म्हात्रे या कंपनीने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने काही महिन्यातच या रस्त्याला तडे गेले आहेत, ठिकठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत, ज्यामुळे अनेक अपघात होत असून, या रस्त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी यासाठी बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रारी केल्यात, मात्र कारवाई होत नसल्याने खासदार जाधव यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे थेट या रस्त्याची तक्रार केली आहे, आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
COMMENTS