Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा रुग्णालयात संविधान दिन साजरा

सातारा / प्रतिनिधी : संविधान दिनानिमित्त क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालय, सातारा येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या

सातारा जिल्ह्यातील पाच गुंड वर्षासाठी तडीपार
स्मार्ट मीटरमुळे ग्राहक सेवेचा दर्जा वाढणार : विजय सिंघल
वाठारला महिलांच्या ग्रामसभेत दारू दुकान-बिअर बारला विरोध

सातारा / प्रतिनिधी : संविधान दिनानिमित्त क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालय, सातारा येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या प्रमुख उपस्थित संविधान दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रस्तावनेचे वाचन करून करण्यात आली. यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्त्वांची, नागरिक म्हणून आपली कर्तव्ये व जबाबदार्‍यांची सविस्तर माहिती दिली.
या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष कदम, वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 डॉ. अरुंधती कदम, प्रशासकीय अधिकारी डॉ. स्मिता लोंढे, डॉ. राहुल जाधव, शल्यचिकित्सक वर्ग 1 कार्यालयीन अधिक्षक विकास भुजबख तसेच सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी भारताच्या संविधानाबद्दल आदर, निष्ठा व जागरूकता वाढविण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रुग्णालय प्रशासनामार्फत करण्यात आले. संविधान दिनाचा हा उपक्रम अत्यंत उत्साहात, शिस्तबध्द व प्रेरणादायी वातावरणात झाला.

COMMENTS