किरीट सोमय्यांना दिलासा ; उच्च न्यायालयात जामीन मंजूर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किरीट सोमय्यांना दिलासा ; उच्च न्यायालयात जामीन मंजूर

मुंबई : भाजप नेते किरीठ सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम हो

डोनाल्ड ट्रम्प हुश मनी प्रकरणात दोषी
खबरदार! ५० टक्केला हात लावला तर !
फलटण येथे जुगार अड्ड्यावर छापा; पावणेदोन लाखाचा मुद्देमाल जप्त

मुंबई : भाजप नेते किरीठ सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम होती. मात्र बुधवारी सोमय्यांना दिलासा मिळाला असून, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.
’विक्रांत बचाव’ मोहिमेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप महाविकास आघाडीमधील नेत्यांनी सोमय्यांवर केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून किरीट सोमय्या आऊट ऑफ रीच आहेत. अटक झाल्यास किरीट सोमय्या यांना 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर सोडण्यात येईल. तर 18 एप्रिलपासून चार दिवस सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागेल, या शर्ती ठेवण्यात आल्या आहेत.
याआधी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमय्या यांच्या घरावर धडक देत त्यांना सकाळी अकरा वाजेपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. यापूर्वीही सोमय्या पिता-पुत्रांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते, मात्र ते दोघेही हजर झाले नव्हते. दुसर्‍या नोटिसीनंतरही ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत, तर त्यांना फरार घोषित केले जाईल, असं पोलिसांनी सांगितलं होतं. मंगळवारीच पुत्र नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यामुळे धक्का बसलेल्या किरीट सोमय्यांना तूर्तास उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. ’विक्रांत बचाव’ मोहिमेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा फंड जमा करुन घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून सोमय्या परागंदा झाले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सोमय्या यांच्या घरी जाऊन राहत्या घराच्या दरवाजावर नोटीस चिटकवली होती. या नोटीशीमध्ये सकाळी अकरापर्यंत त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे तूर्तास सोमय्यांना दिलासा मिळाला आहे.

COMMENTS