Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न : ना. अ‍ॅड. यशोमती ठाकूर

मुंबई / प्रतिनिधी : महिला व बाल विकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, महिलांच्या क्षमता विकसित करून त्यांच्यात उद्योजकीय विकास घडवून आणणे व

दुचाकी-ट्रक धडकेत युवक जागीच ठार; एक जखमी
बेशिस्त-बेदरकारपणे वाहन चालविणार्‍यांवर कडक कारवाई करा : ना. देसाई
म्हसवड-हिंगणी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ठिय्या

मुंबई / प्रतिनिधी : महिला व बाल विकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, महिलांच्या क्षमता विकसित करून त्यांच्यात उद्योजकीय विकास घडवून आणणे व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे याच बरोबरीने महिलांच्या सक्षमीकरणाचे आणि सशक्तीकरणाचे काम आपण विभागाच्या माध्यमातून करीत असून महिलांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत. महिला धोरणाचा मसुदा अंतिम टप्प्यात आहे. माविमच्या माध्यमातून राज्यात सुमारे दीड लाख बचत गटांची स्थापना केली असून साडेसतरा लाख महिलांचे अतिशय उत्तम आणि प्रभावी संघटन महाराष्ट्रात उभे करण्यात यश आले आहे. येत्या अडीच वर्षात एक कोटी महिलांचे संघटन करण्याचा मानस आहे. सुदृढ बालके, सुदृढ कुटुंब, सुदृढ समाज आणि सुदृढ राष्ट्र घडवायचे आहे. अंगणवाड्यांमधून योग्य आहार गरोदर व स्तनदा माता, मुले यांना पुरविण्यात येत आहे. कोरोना काळातही यात खंड पडू दिला गेलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव आय ए कुंदन यांनी केले तर आभार एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल यांनी मानले. महिला व बालविकास विभागातील अधिकारी, विविध क्षेत्रातील महिला व प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोविड परिस्थितीत विविध उपक्रमात उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पोषण अभियान जन आंदोलन कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कार्यकृती केलेले जिल्हे : प्रथम क्रमांक- सातारा, द्वितीय – अमरावती, तृतीय – पुणे. पोषण अभियान जन आंदोलन कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट लोकसहभाग घेतलेले जिल्हे : प्रथम-रायगड, द्वितीय – अमरावती, तृतीय – नाशिक. पोषण ट्रॅकर नोंदी केलेले सर्वोत्कृष्ट नागरी प्रकल्प : प्रथम : बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प ठाणे-3, द्वितीय : बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, नांदेड-3, तृतीय : बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प गडचिरोली. विशेष पुरस्कार : कोविडमध्ये दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांसाठी शासकीय मदत दूत योजना : नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हाधिकारी यांना सन्मानीत करण्यात आले.
कोविड परिस्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी रोहिणी ढवळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, सर्व मदतनीस यांनी पोषण अभियान जन आंदोलन कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याबद्दल राज्य शासनाने आमचा गौरव केला. तळागाळात काम करणार्‍या आमच्या सहकार्‍यांच्या कामगिरीमुळे पोषण अभियानात सातारा जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. मी या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. या सर्वांच्या वतीने आम्ही हा पुरस्कार स्विकारला असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बोलताना स्पष्ट केले.

COMMENTS