Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बस स्थानकाच्या डबक्यामध्ये घातला चिखलाचा अभिषेक

भाकपचे संजय नांगरे यांनी चिखल अंगावर घेऊन केला बस प्रशासनाचा निषेध

शेवगाव तालुका ः ऐन पावसाळ्यामध्ये शेवगाव बस स्थानकामध्ये चलाने साचलेल्या डबक्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नांगरे यांनी साचलल्या चिखलामध्ये

नेवाशात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार
विकासकामात राजकारण बाजूला ठेवत सर्वांना सोबत घेत गावाचा विकास करू – भोरू म्हस्के
नगर तालुक्यातील नागरदेवळे होणार लवकरच नगरपालिका

शेवगाव तालुका ः ऐन पावसाळ्यामध्ये शेवगाव बस स्थानकामध्ये चलाने साचलेल्या डबक्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नांगरे यांनी साचलल्या चिखलामध्ये चिखलाचा अभिषेक करून बस स्थानक प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.शेवगाव बस स्थानकाचे बांधकाम गेल्या सहा-सात वर्षापासून संत चालू आहे. त्यातच पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे बस स्थानकामध्ये साचलेल्या पाण्याच्या साचलेल्या डबक्यामुळे हाल होत आहेत. त्याचबरोबर स्थानकांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही, बस स्थानकामध्ये साचलेले घाणीचे साम्राज्य, बस स्थानकाला असणार्‍या बसेसची कमतरता, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, नादुरुस्त बसेस या गोष्टीचा निषेध व्यक्त करत बुधवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नांगरे यांनी शेवगाव बस स्थानकातील पाण्याने साचलेल्या खड्ड्यामध्ये बसून चिखलाने अभिषेक केला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे हे यावेळी चिखल अभिषेका वेळी हजर होते.

COMMENTS