Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी नगरपालिकेच्या शहर पथविक्रेता समिती निवडणुकीमध्ये काँग्रेसची मुसंडी

पाथर्डी ः केंद्र सरकारने स्थापन केलेल्या फेरीवाला धोरणानुसार पाथर्डी नगरपालिकेच्या शहर पथविक्रेता समितीची यावेळेस प्रथमच निवडणूक झाली या निवडणुकी

सत्येन मुंदडा यांची अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशनच्या चेअरमनपदी निवड
यूपीएससीत यश मिळवलेल्या शहरातील युवकाचा आमदार संग्राम जगताप यांनी केला गौरव
गतवर्षीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकर्‍यांचे बोंबाबोंब आंदोलन

पाथर्डी ः केंद्र सरकारने स्थापन केलेल्या फेरीवाला धोरणानुसार पाथर्डी नगरपालिकेच्या शहर पथविक्रेता समितीची यावेळेस प्रथमच निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने आठपैकी चार जागांवर विजय मिळवून जोरदार यश प्राप्त केले. यामध्ये राजू नामदेव पाचरणे, अफरोज अल्ताफ बागवान,तनवीर शफिक आतार, हसीना बाबा आतार यांनी या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे वतीने विजय मिळवला.
पाथर्डी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नासीर शहानवाज शेख यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली गेली. यावेळी बोलताना नासिर शेख म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवत यश मिळवले. या यशाचे श्रेय सर्व फेरीवाले मतदार, उमेदवार व पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकार्‍यांना जाते. काँग्रेस पक्षाचे वतीने आम्ही शहरातील छोटे व्यवसायिक व फेरीवाले यांच्या प्रश्‍नांसाठी आंदोलने केली याचे फलित म्हणजे या फेरीवाल्यांना केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणानुसार प्रमाणपत्र, क्रमांक रजिस्ट्रेशन व व बॅच लायसन सर्व मंजूर झाले असून यावेळी प्रथमच कमिटी स्थापन होण्यासाठी निवडणूक झाली. ही निवडणूक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून आम्ही प्रयत्न केले. यावेळी विजय उमेदवारांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी पाथर्डी तालुका काँग्रेस अध्यक्ष नासिर शहानवाज शेख, किशोर डांगे, राहुल ढाकणे, फारुख शेख, करीम शेख, जुनेद पठाण, अक्रम आतार, मुन्ना शेख, जब्बार आतार, रफिक शेख, मुनीर शेख, बशीर शेख, शाहरुख बागवान, इलियास बागवान, जावेद पिंजारी, भैय्या बागवान आदीजण उपस्थित होते.

COMMENTS