Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसचे उद्या राज्यभर ’चिखल फेको’ आंदोलन

मुंबई ः वाढत चाललेली महागाई, बेरोजगारीची समस्या, नीट पेपरफुटीचे प्रकरण, महिलांची सुरक्षा, खते, बि-बियाण्यांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकर्‍यांची ह

जिल्हा परीषदेच्या स्वार्थी आधिका-यांची नासावारी वापरुन शासनाची तिजोरी बेशरमांच्या फुलांच्या पायघड्या घालत कागदी विमान उडवत  लक्ष्यवेधी आंदोलन:- डॉ.गणेश ढवळे
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार जाहीर
मुंबादेवी मंदिरात सध्या कुठल्याही प्रकारची मास्क सक्ती नाही

मुंबई ः वाढत चाललेली महागाई, बेरोजगारीची समस्या, नीट पेपरफुटीचे प्रकरण, महिलांची सुरक्षा, खते, बि-बियाण्यांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकर्‍यांची होत असलेली अडवणूक याविरोधात राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे शुक्रवारी, 21 जून रोजी राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांवर सकाळी 11 वाजता सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून ‘चिखल फेको’ आंदोलन करून भाजपाप्रणित सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना राज्यातील सत्ताधारी महायुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला आहे. सरकारने जनतेला वार्‍यावर सोडून दिले असून महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष शुक्रवार 21 जून रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालढकल केली जात असून अनेक ठिकाणी चिखलामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. श्रीमंतांची मुले गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत. मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती-धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

COMMENTS