Homeताज्या बातम्यादेश

काँग्रेसच एक दिवस भाजपचा पराभव करेल – राहुल गांधी

जयपूर/प्रतिनिधी ः काँंग्रस फुटली असे म्हणणे चुकीचे असून, एक दिवस काँगे्रसच भाजपचा पराभव करेल, असा दावा काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

पिंपरी चिंचवड हादरलं !
नवरदेवाने लग्नाच्या स्टेजवरच नवरीला लगावली चापट;पहा व्हिडीओ | LOK News 24
रॅगिंगला कंटाळून मेडिकलच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

जयपूर/प्रतिनिधी ः काँंग्रस फुटली असे म्हणणे चुकीचे असून, एक दिवस काँगे्रसच भाजपचा पराभव करेल, असा दावा काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस अगदी योग्य मार्गावर असून, आगामी काळात काँग्रेसच भाजपचा पराभव करेल. भाजप आणि आरएसएसचे काम काँग्रेसला बदनाम करण्याचे आहे. आमची विचारधारा भाजप आणि आरएसएसच्या विरोधात आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये’ भारत जोडो यात्रे’ दरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी हा दावा केला.


जाणूनबुजून आपली प्रतिमा खराब केल्याच्या मुद्द्याचा राहुल गांधींनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, माझ्या आणि काँग्रेस पक्षाविरुद्ध पद्धतशीर मोहीम सुरू करण्यात आली आहे. पक्ष संपत आहे, असा प्रचार भाजपकडून करण्यात आला. मात्र काँग्रेस हा वैचारिक पक्ष असून फॅसिझमच्या विरोधात ठामपणे उभा राहिला आहे. माझे शब्द लक्षात ठेवा, काँग्रेसच भाजपला पराभूत करेल. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील नुकत्याच झालेल्या वादावर राहुल गांधी म्हणाले की, आमच्या पक्षात कोणीही नाही. त्यातही गोंधळ नाही. आमच्या पक्षात असे प्रकार घडत असतात. केवळ कार्यकर्त्यांचेच नव्हे, तर सर्वसामान्यांचेही काँग्रेसवर अतोनात प्रेम असल्याचे आपण पाहिले असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

COMMENTS