Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटण तालुक्यात काँगे्रस शून्यातून विश्‍व निर्माण करणार : आ. पृथ्वीराज चव्हाण

पाटण : प्रचार सभेत बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण (आराधना फोटो, पाटण) पाटण / प्रतिनिधी : पाटणमध्ये काँग्रेस पक्षाचे फार मोठे आस्तित्व नाही. पण आम्ही

शिक्षकांचे प्रलंबीत प्रश्‍नांची सकारात्मक पध्दतीने सोडवणुक होण्याची अपेक्षा -बाबासाहेब बोडखे
टाटा कमिन्स कंपनीचे दीड कोटीचे इंधन इंजेक्टरची चोरी
गावात नको बार-नको वाईन शॉप; वाठारच्या महिला पाठोपाठ आता पुरूषांचीही सुर

पाटण / प्रतिनिधी : पाटणमध्ये काँग्रेस पक्षाचे फार मोठे आस्तित्व नाही. पण आम्ही शून्यातून विश्‍व निर्माण करणार आहोत, थेंबे थेंबे तळे साठणार आहे. ग्रामीण भागात आगामी जि. प., पं. स. च्या निवडणूका ही आम्ही लढवणार आहोत. भारतीय जनता पक्षाचे शासन देशातून काढून टाकायचे असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
पाटण नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवारांच्या रविवारी पाटण येथे आयोजित प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी पक्ष निरिक्षक श्रीरंग नाना पाटील, प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माजी सभापती एल. एम. पवार, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, श्रीनिवास पाटील, तालुकाध्यक्ष पांडुरंग यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पाटण शहराला पूर्वी ग्रामपंचायतचा दर्जा होता. राज्यातील 143 ग्रामपंचायत ज्या ठिकाणी तालुका मुख्यालय होती. त्या ग्रामपंचायतींचे नगरपंचायती करण्याचा धोरणात्मक निर्णय मी माझा कारकिर्दीत घेतला. शहराचा नागरी विकास होणे गरजेचे आहे. घनकचरा व्यवस्थापन, रस्ते चांगले पाहिजे, हिरवागार परिसर हे शहरात असले पाहिजे. मलकापूर नगरपंचायतीमध्ये फिल्ट्ररेशन चोवीस बाय सात ही योजना आम्ही केली. महाराष्ट्रातील नंबर एकची ही योजना घडली आहे. चांगले नेतृत्व असेल तर विकास काम घडते. पाटण नगरपंचायतीच्या ओबीसीच्या उर्वरित चार जागांवरती ही काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार आहे असे जाहीर करून ते पुढे म्हणाले की, देशातील भाजपचे धोरण पाहिले तर देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेस शिवाय पर्याय नाही असे लोकांचे मत झालेले आहे. पाटण नगरपंचायत निवडणूकीत काँग्रेस पक्षाने स्वबळावरती लढण्याची तयारी दाखवली. लोकांना वाटेल पाटणमध्ये काँग्रेस पक्षाचे फार मोठे आस्तित्व नाही. पण आम्ही शून्यातून विश्‍व निर्माण करणार आहोत. थेंबे-थेंबे तळे साठणार मोदी सरकार हटवायची ताकद दुसर्‍या कोणत्याही प्रादेशिक पक्षात नाही. देशातील लोकशाहीचे संरक्षक करण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाने घेतली आहे. काँग्रेस हा देशभर तळागळात रूजलेला पक्ष आहे. सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्या व सहकार्य करा, असे आवाहन आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शेवटी केले.
जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव म्हणाले, काँग्रेस पक्ष हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. महागाई वाढली आहे, सामान्य माणसाला जगणे मुश्कील झाले आहे, काँग्रेस हाच एकमेव पक्ष आहे जो आपणास तारू शकेल.
नरेश देसाई यांनी आभार मानले. या सभेस तालुका उपाध्यक्ष डॉ. संतोष कदम, सरचिटणीस अ‍ॅड. राजन भिसे, शहराध्यक्ष दर्शन कवर, विकास हादवे, नांगरे यांच्यासह उमेदवार, मतदार, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

COMMENTS