Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँगे्रस प्रवक्ते राजू वाघमारेंनी सोडली पक्षाची साथ

शिंदेंच्या शिवसेनेमध्ये केला अधिकृत प्रवेश

मुंबई ः काँगे्रसची बाजू माध्यमांसमोर प्रभावीपणे मांडणारे काँगे्रसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी काँगे्रसची साथ सोडत मंगळवारी अधिकृतरित्या काँगे्र

अबब… जामखेडला रेमडेसिव्हर २५-३० हजारात ? | ‘आपलं नगर’ | LokNews24
मुंबईत पाणी संकट अधिक गडद
मराठ्यांना आरक्षण द्या नसता सत्तेतून पायउतार व्हा-परमेश्‍वर घोडके

मुंबई ः काँगे्रसची बाजू माध्यमांसमोर प्रभावीपणे मांडणारे काँगे्रसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी काँगे्रसची साथ सोडत मंगळवारी अधिकृतरित्या काँगे्रसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशाने ऐन निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेमध्ये राजू वाघमारे यांना मुख्य सहप्रवक्ते अणि उपनेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आतापर्यंत काँग्रेसमधील महत्वाच्या नेत्यांनी शिंदे गटात किंवा भाजपमध्ये प्रवेश केल्याचे समोर आले आहे. काँग्रेसमधील पदाधिकार्‍यांचे गाळप होण्याची प्रक्रिया सुरूच आहे. आता राजू वाघमारे यांचाही शिंदे गटात प्रवेश झाला आहे. शिंदे गटामध्ये त्यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. अनेक बडे नेते काँग्रेसची साथ सोडत आहेत. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. राजू वाघमारे प्रसारमाध्यमांसमोर काँग्रेसची बाजू रोखठोकपणे मांडत होते. पण लोकसभा निवडणूकीच्या तोंडावरच त्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारेंनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केल्यामुळे मुंबईत काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. काँग्रेस पक्षाची सध्या होत असलेली फरफट आणि पक्षातील काही नेत्यांच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. दीर्घकाळापासून राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते होते. त्यांनी माध्यमांसमोर पक्षाची भूमिका अनेकदा परखडपणे जाहीर केली होती. अशातच आता वाघमारेंनी काँग्रेसची साथ सोडली आहे.

COMMENTS