Homeताज्या बातम्यादेश

मनरेगासाठी काँग्रेसचा देशव्यापी लढा

8 जानेवारी ते 25 फेबु्रवारीपर्यंत ‘मनरेगा बचाओ’ मोहीमनवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) वाचवण्यासाठी काँग्रेस

लातूर ग्रामीणमधील रस्त्यांचे चित्र पालटणार
काँग्रेसला संधी….पण?
संवाद हरवल्याने काँग्रेसची वाताहात!

8 जानेवारी ते 25 फेबु्रवारीपर्यंत ‘मनरेगा बचाओ’ मोहीम
नवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाने व्यापक आंदोलनाची घोषणा केली आहे. 8 जानेवारीपासून 25 फेब्रुवारीपर्यंत देशभर ‘मनरेगा बचाओ संग्राम’ राबवण्यात येणार असून, गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत विविध उपक्रम, जनजागृती कार्यक्रम आणि आंदोलनांचा यात समावेश असेल. यासोबतच देशाच्या वेगवेगळ्या भागांत चार भव्य जाहीर सभा आयोजित केल्या जाणार आहेत.
काँग्रेसचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि सरचिटणीस जयराम रमेश यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या मोहिमेची रूपरेषा मांडली. केंद्र सरकारने अलीकडेच लागू केलेल्या नव्या कायद्यामुळे मनरेगाच्या मूळ संकल्पनेवरच घाला घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हा कायदा संविधानाच्या तरतुदींशी विसंगत असून, त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जयराम रमेश यांनी सांगितले की, नव्या कायद्यामुळे राज्यांच्या अधिकारांवर मर्यादा येत असून, मनरेगाच्या अंमलबजावणीत राज्यांना सक्तीने 40 टक्के आर्थिक वाटा उचलण्यास भाग पाडले जात आहे. हा प्रकार संघराज्यीय व्यवस्थेच्या विरोधात असल्याचे त्यांनी नमूद केले. वेणुगोपाल यांनी मनरेगाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, ही योजना केवळ रोजगार देणारी नसून ग्रामीण भारतासाठी एक मजबूत सामाजिक सुरक्षा कवच आहे. दरवर्षी कोट्यवधी ग्रामीण कुटुंबांना रोजगार देणारी ही योजना जागतिक स्तरावरही प्रशंसित आहे. मात्र नव्या कायद्यामुळे रोजगाराचा हक्कच कमकुवत होत असून, तो काही निवडक पंचायतांपुरताच मर्यादित केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. या अभियानामुळे पुन्हा एकदा काँगे्रस आक्रमक पावित्रा घेत जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे.

COMMENTS