काँग्रेस नेते हार्दिक पटेल,मंत्री धनंजय मुंडे यांची कर्जतला जाहीर सभा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेस नेते हार्दिक पटेल,मंत्री धनंजय मुंडे यांची कर्जतला जाहीर सभा

कर्जत/प्रतिनिधी : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये राजकीय वातावरण तापलेले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना पाहा

*‘राधे’, प्रेक्षकांसाठी ठरेल मनोरंजनाची मेजवानी! Radhe Movie | फिल्मी मसाला | LokNews24
शहाजापूर येथे टाळ मृदुंगाच्या गजरात गणपती विसर्जन
आरपीआयच्या कामगार आघाडी जिल्हाध्यक्षपदी खंडुजी मोरे

कर्जत/प्रतिनिधी : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये राजकीय वातावरण तापलेले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळत आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी निवडणूक लढवत आहे.  शुक्रवार, दि. १७ डिसेंबर रोजी कर्जत येथे काँग्रेस नेते व गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल तसेच महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जत येथील फाळके पेट्रोलपंपाशेजारी ही सभा दुपारी ४ वाजता पार पडणार आहे. ही निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता राज्य तसेच देश पातळीवरील मोठे राजकीय नेते नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथे येत आहेत. या सभेला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. काँग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल आणि राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे हे कर्जतच्या जनतेला संबोधित करणार आहेत. तसेच या भव्य आणि जाहीर सभेची तयारीही मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. तसेच २१ तारखेला नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.

COMMENTS