कॉँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष काळे नगर शहराचे आमदार होतील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॉँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष काळे नगर शहराचे आमदार होतील

आ. थोरात यांनी व्यक्त केला विश्‍वास

अहमदनगर/प्रतिनिधी : काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे शहराचे आमदार होतील, असा विश्‍वास माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यां

फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात जनमत ः थोरात
‘सांज पाडवा’ सांस्कृतिक वैभव जोपासणारा कार्यक्रम ः थोरात
शेतकर्‍यांच्या जीवनात पशुधनाचे मोठे महत्त्व ः थोरात

अहमदनगर/प्रतिनिधी : काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे शहराचे आमदार होतील, असा विश्‍वास माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. नगर शहरामध्ये काळे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम संघटनात्मक बांधणी सुरू आहे व सातत्याने पक्ष प्रवेश सुरू आहेत. काळे यांनी शहरात नव्या दमाची चांगली टीम उभी केली आहे. शहरातील विविध घटक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी ते नेहमी धावून जात असतात. अशाच पद्धतीने समाजाचे काम त्यांनी सतत सुरु ठेवले आणि संघटनात्मक बांधणी शहरात सातत्याने सुरू राहिली तर काळे नक्की काँग्रेसच्या माध्यमातून नगर शहराचे आमदार होतील, असे प्रतिपादन आ. थोरात यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील मीरपूर येथील मेळाव्यात थोरात बोलत होते. या मेळाव्यात नगर मनसेचे माजी उपशहर प्रमुख अभिनय गायकवाड, प्रभाग क्रमांक 12 मधील माळीवाडा भागातील ज्योती उमेश साठे, दीपक जपकर, सावेडीतील इंजिनिअर सुजित क्षेत्रे यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी काळे यांच्यासह मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीणभैय्या गीते, निलेशदादा चक्रनारायण, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओव्हळ, मागासवर्गीय काँग्रेस विभागाचे प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष सांगळे उपस्थित होते. यावेळी गायकवाड, साठे, जपकर यांच्यासह राहुल गोहेर, विनोद दिवटे, संभाजीराजे, शाहू होले, सौरभ भुजबळ, रमेश पुरी, राजू डाके, सतीश गायकवाड, शहबाज बागवान, तोफिक शेख, हरुण इनामदार, विजय जाधव, मोसिन शेख, रवी वाव्हळ, रणजीत जाधव, आदेश साठे, मनोज वाळके, भैय्या साठे, भगवान जगताप, अभिजीत साठे, प्रमोद वाघमारे, सागर साळवे, अंबादास गाडे, अश्‍विन पानपाटील, मंगेश बर्गे, राम तिवारी, स्वप्निल सातव आदींनी नगर शहर काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

संगमनेर मॉडेल राबवणार
यावेळी किरण काळे म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये नगर शहर विधानसभा मतदारसंघ हा विकासाच्याबाबतीत सर्वात मागासलेला मतदारसंघ आहे. आजही नगर शहराचे असंख्य प्रश्‍न प्रलंबित आहेत. संगमनेरमध्ये नगरपरिषद असून देखील आ. थोरात यांच्या विकासात्मक व्हीजनमधून विकासाचे चांगले मॉडेल संगमनेरमध्ये राबविले गेले आहे. नगर शहरामध्ये देखील संगमनेरच्या धर्तीवर विकासाचे मॉडेल राबवण्याची गरज आहे. आगामी काळात महापालिकेत सत्ता मिळवत शहर काँग्रेस विकासाच्या संगमनेर मॉडेलची अंमलबजावणी नगर शहरामध्ये निश्‍चितपणे करेल, असा दावा त्यांनी केला.

COMMENTS