Homeताज्या बातम्यादेश

काँग्रेस-भाजप खासदारांत धक्काबुक्की

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वक्तव्याचे संसदेत पडसाद उमटत असतांना गुरूवारी काँगे्रस आणि भ

शिवभोजनच्या वर्धापनदिनानिमित्त इस्लामपूरात मोफत चिकन व मसुरा थाळी
संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी
वाचनसंस्कृती वाढवली तरच, नीती आणि नाती टिकतील ः देशमुख

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वक्तव्याचे संसदेत पडसाद उमटत असतांना गुरूवारी काँगे्रस आणि भाजप खासदारांत संसद भवन परिसरात धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. यात ओडिशातील बालासोर येथील भाजप खासदार प्रताप सिंग सारंगी संसदेच्या पायर्‍यांवरून पडले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना व्हीलचेअरवर उपचारासाठी नेण्यात आले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याने ते पडल्याचा आरोप सारंगी यांनी केला. ते म्हणाले की, राहुल यांनी काही खासदारांना धक्काबुक्की केली. खासदार त्यांच्या अंगावर पडल्याने दुखापत झाली.
यासंदर्भात बोलतांना काँगे्रस नेते राहुल गांधी म्हणाले की, आम्ही संसदेच्या मकर द्वाराने आत चाललो होतो. त्यावेळी भाजपचे काही खासदार उभे होते. त्यांनी आम्हाला आत जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. त्यात धक्काबुक्की झाली. हे लोक संविधानावर आक्रमण करत आहेत, तसंच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानही भाजपाने केला आहे. असे राहुल गांधींनी म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आरोप केला की, भाजप खासदारांनी राहुल आणि प्रियांका यांना धक्काबुकी केली.

खरगेंसह आम्हाला धक्काबुक्की केली : राहुल गांधी
यासंदर्भात बोलतांना काँगे्रस नेते राहुल गांधी म्हणाले मी धक्काबुक्की केलेली नाही. मला धक्काबुक्की करण्यात आली. आम्हाला भाजपच्या खासदारांनी संसदेत जाण्यापासून अडवले. राहुल गांधी म्हणाले की आम्हाला धक्काबुक्की करण्यात आली आहे, आम्ही पायर्‍यांवर उभे होतो. जे काही घडलं आहे ते कॅमेरात कैद झाले आहे. मल्लिकार्जुन खरगेंना धक्काबुक्की करण्यात आली. धक्काबुक्की करुन काहीही साध्य होणार नाही. भाजपचे खासदार हे आम्हाला संसदेत जाण्यापासून रोखू शकत नाहीत असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

COMMENTS