Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अदानी प्रकरणी काँगे्रसचे हल्ले सुरूच

काँगे्रस घेणार आज राज्यभर पत्रकार परिषदा

मुंबई/प्रतिनिधी ः अदानी प्रकरणावरून महाराष्ट्र प्रदेश काँगे्रस आक्रमक झाली असून, काँग्रेसने हा मुद्दा लावून धरण्याचे ठरवले असून आज शुक्रवार 31 मा

येसगावच्या विकासाची वाटचाल कायम सुरू राहील ः कोल्हे
प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात अनेकांना नोकरी
सनी देओलने केले ‘ऍनिमल’मधील बॉबी देओलच्या अभिनयाचे कौतुक

मुंबई/प्रतिनिधी ः अदानी प्रकरणावरून महाराष्ट्र प्रदेश काँगे्रस आक्रमक झाली असून, काँग्रेसने हा मुद्दा लावून धरण्याचे ठरवले असून आज शुक्रवार 31 मार्च रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काँगे्रस पत्रकार परिषदा घेण्यात येणार आहेत. अदानींच्या बोगस कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी रुपये कुठून आले,’ याचा जाब काँग्रेस मोदी सरकारला विचारणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ‘मोदी-अदानी यांच्या भ्रष्ट युतीने देशाच्या लोकशाही व संविधानावर घाला घातला आहे. सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवून हुकूमशाही कारभार सुरू आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ठाण्यात, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात अहमदनगर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण परभणी तर पृथ्वीराज चव्हाण पुणे शहरात पत्रकार परिषदांना संबोधित करतील. माजी मंत्री, प्रदेश कार्याध्यक्ष, मुख्य प्रवक्ते, प्रवक्ते, आमदार, खासदार व प्रमुख नेते राज्यातील इतर जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन मोदी-अदानी कथित भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करणार आहेत. अदानी सूमहात 20 हजार कोटी रुपये कुठून आले? याची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करावी ही काँग्रेसची मुख्य मागणी आहे, पण मोदी सरकार या चौकशीला घाबरत आहे. मोदी सरकारला थेट जाब विचारणार्‍या राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून सरकारी घर खाली करण्याची नोटीसही मोदी सरकारनं बजावली आहे. या हुकुमशाहीचा पत्रकार परिषदेत पर्दाफाश केला जाईल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

COMMENTS