Homeताज्या बातम्यादेश

काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली

नवी दिल्ली प्रतिनिधी - भारतीय निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा

शेकडो युवक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
महानगरपालिकेवर काँग्रेसचा भव्य आसूड मोर्चा
शिवसेनेचे दोन बडे नेते काँग्रेसमध्येl LokNews24

नवी दिल्ली प्रतिनिधी – भारतीय निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. छत्तीसगड वगळता इतर चार राज्यांची विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. या पाच राज्यातील निवडणुका ५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. तर, ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर या पाच राज्यांमधील वेगवेगळे पक्ष कामाला लागले असून अनेक पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने १५ ऑक्टोबर सकाळी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांमधील त्यांच्या उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर केल्या आहेत. काँग्रेसने मध्य प्रदेशमधील १४४, छत्तीसगडमधील ३० आणि तेलंगणा विधासभा निवडणुकीसाठीच्या ५५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने आधीच जाहीर केलं होतं की, नवरात्रोत्सवाआधी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल. त्यानुसार आज घटस्थापनेच्या दिवशी काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केली.

COMMENTS