Homeताज्या बातम्यादेश

नवीन पेन्शन योजनेवरुन काँग्रेस आक्रमक

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने आणलेल्या नवीन पेन्शन योजनेविरोधात काँगे्रसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँगे्रसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी योज

मोबाईल टॉवरची बॅटरी चोरणारे मोठे रॅकेट उघडकीस; सात आरोपी अटकेत; तिघे फरार, शोध सूरू
Lonand : जमिनीतील बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी तहसील कार्यालयावर अमरण उपोषण (Video)
राहुरी पोलीसांच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने आणलेल्या नवीन पेन्शन योजनेविरोधात काँगे्रसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँगे्रसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी योजनेतील ’यू’ म्हणजे मोदी सरकारचा ’यू-टर्न’ असल्याचे म्हणत मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्राने सरकारी कर्मचार्‍यांसाठी यूनिफाइड पेन्शन स्कीम नावाची नवीन निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे. 1 एप्रिल 2025 या योजनेची सुरुवात होईल. दरम्यान, आता या योजनेवरुन राजकारणाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या योजनेवरुन नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली.
खरगे यावेळी म्हणाले की, 4 जूननंतर पंतप्रधानांच्या सत्तेच्या अहंकारावर जनतेच्या शक्तीने मात केली. लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांच्या उदयामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने अलीकडेच आपल्या महत्त्वाच्या निर्णयांवरुन माघार घ्यायला सुरुवात केली आहे. आम्ही आमचे उत्तरदायित्व सुनिश्‍चित करत राहू आणि या निरंकुश सरकारपासून 140 कोटी भारतीयांचे संरक्षण करू. खरगे यांनी आपल्या पोस्टमध्ये नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या काही निर्णयांचा उल्लेख केला. हे निर्णय विरोधकांच्या विरोधानंतर मागे घेण्यात आले आहेत. यामध्ये लाँग टर्म कॅपिटल गेन/इंडेक्सेशनबाबत अर्थसंकल्पात घेतलेला निर्णय मागे घेणे, वक्फ विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवणे, प्रसारण विधेयकाचा मसुदा मागे घेणे आणि ब्युरोक्रसीमधील लॅटरल एंट्री रद्द करणे, या निर्णयांचा समावेश असल्याचे म्हटले आहे.  

COMMENTS