पंढरपूर प्रतिनिधी - काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशभरात काँग्रेसकडून पडसाद उमटताना दिसत आहेत. यामध्ये पंढरपुरात

पंढरपूर प्रतिनिधी – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशभरात काँग्रेसकडून पडसाद उमटताना दिसत आहेत. यामध्ये पंढरपुरात काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी यांची प्रतिमा जाळून आंदोलन करण्यात आले. तसेच टायर पेटवून तीव्र निषेधही करण्यात आला. यावेळी मोदी हटाव देश बचावा अशा घोषणा देवून कालावधी पूर्ण होण्या अगोदर राहुल गांधी यांच्यावर केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या.
COMMENTS