मान्यवरांच्या उपस्थितीत विजय दिवस समारोह समितीमार्फत कार्यक्रमकराड / प्रतिनिधी ः विजय दिवसानिमित्त कराडच्या विजय दिवस समारोह समितीच्यावतीने आज नि
मान्यवरांच्या उपस्थितीत विजय दिवस समारोह समितीमार्फत कार्यक्रम
कराड / प्रतिनिधी ः विजय दिवसानिमित्त कराडच्या विजय दिवस समारोह समितीच्यावतीने आज निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय दिवस चौकातील विजयी स्तंभास पदाधिकारी, अधिकारी, नागरिकांनी अभिवादन केले.
बांग्लामुक्ती संग्रामात भारतीय सैन्य दलाने मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ्य कराडला गेली 24 वर्षे 16 डिसेंबरला विजय दिवस समारोह समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी स्टेडीयममध्ये विजय दिवस समारोह साजरा केला जातो. यंदाचे हे 25 वे वर्ष आहे. निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांनी 24 वर्षापुर्वी कराडला विजय दिवस समारोह सुरु केला. त्यांच्या माध्यमातून सैन्य दलातील लढाऊ विमाने, रणगाडे, शस्त्रास्त्रे, दारुगोळा, थरारक कसरती, घोडदळ, श्वान पथक याचे थेट पाहयची संधी कराडकरांना मिळाली. त्यातून प्रेरणा घेवुन भारत मातेच्या रक्षणासाठी सैन्य दलात भरती होण्याचे युवकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दोन वर्षापासून कोरोनामुळे विजय दिवस समारोह स्थगित करण्यात आला आहे. दरम्यान, विजय दिवसाचे औचित्य साधून आज विजय दिवस समारोह समितीतर्फे विजय दिवस चौकातील विजयी स्तंभास अभिवादन करण्यात आले.
नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, तहसीलदार विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, लेफ्टनंट बी. जी. जाधव, ऑनररी कॅप्टन जगन्नाथ पाटील, ऑनररी कॅप्टन बाबूराव कराळे, सुभेदार मोरे, विजय दिवस समितीचे उपाध्यक्ष अरुण जाधव, सहसचिव विलासराव जाधव, नगरसेवक आप्पा माने, प्रा. बी. एस. खोत, महालिंग मुंढेकर, चंद्रकांत जाधव, पौर्णिमा जाधव, श्रीमती अरुणा जाधव, दिलीप पाटील, उद्योजक दीपक अरबुणे, सलीम मुजावर, माजी प्राचार्य गणपतराव कणसे, तळबीडचे सरपंच जयवंतराव मोहिते, रत्नाकर शानभाग, रमेश पवार, सतीश बेडके यांनी अभिवादन केले. भरत कदम यांनी आभार मानले.
COMMENTS