Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक

मुंबई प्रतिनिधी - अग्गबाई सासुबाई’, ‘जुळून येती रेशीमगाठी’सारख्या अनेक मालिकांमधून घराघरांत पोहोचलेले अभिनेते म्हणजे डॉ. गिरीश ओक. ज्येष्ठ अभ

आरक्षणाचा पेच निकाली ?
राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा विचाराधीन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई प्रतिनिधी – अग्गबाई सासुबाई’, ‘जुळून येती रेशीमगाठी’सारख्या अनेक मालिकांमधून घराघरांत पोहोचलेले अभिनेते म्हणजे डॉ. गिरीश ओक. ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांचे वडील रत्नाकर दिनकर ओक यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर गिरीश ओक यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. गिरीश ओक यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी त्यांच्या वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. याबरोबर त्यांनी वडिलांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याची दु:खद बातमी सांगितली आहे.

COMMENTS